आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:मनमाडच्या वीणा व आकांक्षाला सुवर्ण‎

मनमाड‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील जय भवानी व्यायामशाळेच्या ‎वीणा आहेर व आकांक्षा व्यवहारे‎ यांना राष्ट्रीय खेलो इंडिया‎ वेटलिफ्टिंग स्पर्धेत चमकदार‎ कामगिरी केल्याने सुवर्णपदक‎ मिळाले.‎ इंदूर (मध्य प्रदेश) येथे सुरू ‎असलेल्या पाचव्या राष्ट्रीय खेलो‎ इंडिया वेटलिफ्टिंग स्पर्धेची सुरुवात‎ ४० किलो वजनी गटात वीणा आहेर‎ हिने सुवर्णपदक मिळवीत केली. ५७‎ किलो स्नॅच, ७२ किलो क्लीन जर्क‎ असे १२९ किलो वजन उचलून वीणा‎ आहेर हिने नवीन राष्ट्रीय विक्रमासह‎ सुवर्णपदक पटकावून ऐतिहासिक‎ कामगिरी केली.

तसेच आंतरराष्ट्रीय‎‎ खेळाडू आकांक्षा व्यवहारे हिने ४५‎ किलो वजनी गटात ६७ किलो स्नॅच‎ व ७७ किलो क्लीन जर्क एकूण‎ १४४ किलो वजन उचलून‎ सुवर्णपदक पटकावले. वीणा आहेर‎ येथील कला, वाणिज्य व विज्ञान‎ महाविद्यालय तर आकांक्षा श्री गुरू‎ गोबिंद सिंग हायस्कूलची विद्यार्थिनी‎ आहे. यशस्वी खेळाडूंना छत्रे‎ विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण‎ व्यवहारे व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक‎ तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले‎ आहे.

जय भवानी व्यायामशाळेचे‎ अध्यक्ष डॉ. विजय पाटील, मोहन‎ गायकवाड, डॉ. सुनील बागरेचा, प्रा.‎ दत्ता शिंपी, छत्रे विद्यालयाचे‎ आधारस्तंभ पी. जी. धारवाडकर,‎ मुख्याध्यापक आर. एन. थोरात,‎ केआरटी विद्यालयाचे प्राचार्य मुकेश‎ मिसर, मुख्याध्यापक दीपक‎ व्यवहारे, श्री गुरू गोविंद सिंग‎ हायस्कूलचे अध्यक्ष बाबा रणजित‎ सिंहजी, प्राचार्य सदाशिव सुतार,‎ कला वाणिज्य व विज्ञान‎ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण‎ पाटील, क्रीडा संचालक प्रा संतोष‎ जाधव, महाराष्ट्र वेटलिफ्टिंग‎ संघटनेचे उपाध्यक्ष संतोष सिंहासने,‎ सचिव प्रमोद चोळकर यांनी‎ खेळाडूंचे काैतुक केले.‎

बातम्या आणखी आहेत...