आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांची कामे रखडली:ठिय्या, निदर्शने व माेर्चा काढत जुन्या‎ पेन्शनसाठी शासकीय कर्मचारी आक्रमक‎

येवला‎6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील विंचूर चौफुलीवरील डॉ. बाबासाहेब‎ आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण‎ करत सर्व संघटनातील कार्यकर्त्यांची रॅली‎ तहसील कार्यालयावर काढण्यात आली.‎ शासकीय व निमशासकीय कर्मचारी‎ मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.‎ या मोर्चाचे रूपांतर तहसील कार्यालयात‎ सभेत झाले. या ठिकाणी सुमारे १५ ते २०‎ मिनिटे जोरदार घोषणाबाजी करून‎ कर्मचाऱ्यांनी एकच मिशन, जुनी पेन्शनचा‎ नारा दिला.

तहसील कार्यालयात प्रमुख‎ नेत्यांनी संघटनांची भूमिका जाहीर केली‎ आणि जुनी पेन्शन जोपर्यंत लागू होत नाही‎ तोपर्यंत संपातून माघार घेणार नाही अशी‎ मागणी लावून धरली.‎ यावेळी प्रदेशाध्यक्ष अर्जुन कोकाटे,‎ ग्रामसेवक संघटनेचे जिल्हा नेते रवींद्र‎ शेलार, प्राथमिक शिक्षक संघटनांचे‎ प्रतिनिधी बाजीराव सोनवणे, ग्रामसेवक‎ संघटनेचे तालुकाध्यक्ष रंगनाथ कदम, जुने‎ पेन्शन कृती समितीचे हनुमंत काळे अादींनी‎ मनाेगत व्यक्त केले.‎ यावेळी तहसीलद प्रमोद हिले यांना‎ मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी शासकीय‎ कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी व‎ कार्यकर्ते उपस्थित हाेते.‎

बातम्या आणखी आहेत...