आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपाचा इशारा‎:मागण्यांसाठी ग्रामीण‎ डाक सेवकांचे धरणे‎

मालेगाव‎21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विविध प्रलंबित मागण्यांसाठी‎ गुरुवारी (दि. २) ग्रामीण‎ डाकसेवकांनी एक दिवशीय धरणे‎ आंदोलन केले. मागण्या मान्य न‎ झाल्यास १६ व १७ मार्चला संप‎ पुकारण्याचा इशारा देण्यात आला.‎ जुना बसस्थानकाजवळीक‎ पोस्टाच्या मुख्य कार्यालयासमोर‎ धरणे देण्यात आली.अखिल‎ भारतीय ग्रामीण डाक सेवक‎ युनियन, नॅशनल युनियन ऑफ‎ ग्रामीण डाकसेवक या संघटनांच्या‎ पदाधिकाऱ्यांनी मागण्या मांडल्या.‎

जीडीएस समितीने शिफारस केल्या‎ प्रमाणे १२,२४,३६, सर्व वरिष्ठ डाक‎ सेवक यांना अतिरिक्त वेतनवाढ‎ देण्यात यावी, डायरेक्टर द्वारा‎ अत्यधिक व अव्यवहारीक टारगेट‎ देऊन जीडीएसचा होत असलेला‎ मानसिक व शारीरिक छळ रोखवा,‎ विभागीय स्तरावर अधिकाऱ्यांकडून‎ बेकायदा आदेश काढून टारगेटच्या‎ नावाखाली दमदाटी करणे, बदली‎ करणे, धमक्या देणे आदी प्रकार‎ थांबविण्यात यावे,डाकसेवक‎ कर्मचाऱ्यांच्या रजेच्या काळात‎ बदली कर्मचारी लावण्याची‎ परवानगी देण्यात यावी या मागण्या‎ मान्य करण्याची विनंती केली .‎ निवेदन वरिष्ठांना देण्यात आले.‎ आंदोलनात चंद्रकांत सोनवणे,‎ सुवर्णा घुमरे, प्रमोद महाले, संजय‎ वाघ, बापू बोरसे, सुवर्णा राऊत,‎ अविनाश पवार, नथू माने, पंकज‎ खैरनार आदी सहभागी झाले होते.‎

बातम्या आणखी आहेत...