आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिलावास प्रारंभ‎:खानगाव खरेदी-विक्री केंद्रावर‎ द्राक्षेमणी लिलावास प्रारंभ‎

लासलगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील बाजार समितीच्या‎ कार्यक्षेत्रात व परिसरात सध्या द्राक्षे‎ काढणी हंगाम सुरू झाला आहे.‎ त्यानुसार खानगाव (नजिक) येथे‎ द्राक्षेमणी लिलावाचा प्रारंभ करण्यात‎ आला.‎ प्रारंभी द्राक्षेमणी क्रेटस् चे पूजन‎ संदीप बोरसे, रा. भोयेगाव यांचे‎ द्राक्षेमणी २५ रुपये प्रति किलो या‎ दराने योगेश गायकर यांनी खरेदी‎ केले.

लिलावाच्या पहिल्याच दिवशी‎ १०३ क्रेटस‌्ची आवक होऊन‎ बाजारभाव कमीत कमी ०५ रुपये‎ जास्तीत जास्त २५ रुपये, सरासरी १८‎ रुपये प्रति किलो दराप्रमाणे होते.‎ याप्रसंगी द्राक्षेमणी खरेदीदार‎ विष्णू गायकर, दत्ता मापारी, नवनाथ‎ मापारी, प्रकाश साबळे, धनंजय‎ कापडी, गोरख मापारी, विजयानंद‎ घोरपडे, अतुल घुमरे, खरेदी-विक्री‎ केंद्राचे प्रभारी संतोष पोटे, जय गारे,‎ संदीप वाघ, तुषार शेजवळ, भूषण‎ रायते, रोशन जेऊघाले अादींसह‎ शेतकरी बांधव उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...