आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोसायटी संचालकांचा सन्मान:शेतकऱ्यांना सावकारी पाशातून मुक्त करण्यात सोसायट्यांचे मोठे योगदान; येवल्यात पालकमंत्री छगन भुजबळ यांचे आवाहन

येवला19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात विविध कार्यकारी संस्थांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. त्यांपैकी अनेक संस्था आजही प्रामुख्याने कर्जवाटपाचेच कार्य करताना दिसतात. आजही इतर व्यवहार यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आवश्यक असणारे व्यवस्थापन कौशल्य वाढवण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे संचालकांनी कर्जवाटप करणे एवढेच आपले काम असा समज बदलून आपल्या कामाच्या कक्षा अधिक विस्तारित कराव्यात, असे आवाहन करत शेतकऱ्यांना सावकारी पाशातून मुक्त करण्यासाठी विविध कार्यकारी सोसायट्यांचे योगदान मोलाचे असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

महात्मा फुले नाट्यगृहात आयोजित साेसायटी संचालकांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत एकूण ४३५ विविध कार्यकारी सोसायटया अनिष्ट तफावतीत होत्या. या संस्थांचा कर्ज पुरवठा बंद करण्यात आला होता. यामध्ये येवला तालुक्यातील २३ संस्थांचा समावेश आहे. याबाबत बैठक घेऊन हा प्रश्न सोडवण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनिष्ट तफावतीतील संस्थाना नियमित कर्ज पुरवठा करण्यात येणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महा विकास आघाडी सरकारच्या वतीने राबवण्यात आलेली महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत येवला तालुक्यातील १८ हजार ६४२ शेतकऱ्यांना १७६ कोटी रुपयांच्या अनुदानाचा लाभ मिळालेला आहे.

दोन लाखांवरील कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही अशा नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. त्यांना देखील राज्य शासनाच्या वतीने मदत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते आणि बियाणे मिळावे यासाठी बफर स्टॉक करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खते आणि बियाण्यांची टंचाई भासणार नाही याची दक्षता घेण्यात आलेली असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार यांनी नाशिकला कृषी टर्मिनल मार्केट मंजूर केले होते. सदर प्रकल्पाच्या कामाला गती देण्यात आली असून लवकरच अद्ययावत कृषी टर्मिनल उभे राहणार आहे.

या कृषी टर्मिनल मार्केटमुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला मोठी बाजार पेठ निर्माण होणार आहे. या टर्मिनल मार्केटच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील शेतमाल देशासोबत परदेशात पाठविण्यासाठी टर्मिनल अतिशय उपयुक्त ठरेल असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, सध्या कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात कोसळले असून कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासाठी निर्यातीला चालना देण्याची आवश्यकता आहे. याबाबत राज्य शासनाच्या वतीने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल. केंद्र सरकारकडे नाफेडसह इतर संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा तसेच निर्यातीला प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी त्यांन यावेळी केली.

बातम्या आणखी आहेत...