आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना येवल्यात अभिवादन

येवला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यात माधवराव पाटील संकुल येथे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर फळे वाटप करण्यात आले. याप्रसंगी मर्चंट बँकेचे संचालक प्रमोद सस्कर, शहराध्यक्ष तरंग गुजराथी यांनी मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. सस्कर यांनी तालुक्याशी असलेले मुंढे यांचे नाते व त्यांनी घडविलेला कार्यकर्ता याविषयी आठवणी सांगितल्या. याप्रसंगी गुजराथी, विणकर प्रकोष्टचे मनोज दिवटे, संघटन सरचिटणीस बापूसाहेब गाडेकर, सरचिटणीस कुणाल क्षीरसागर, उपशहराध्यक्ष कुणाल भावसार, महिला मोर्चाचे अध्यक्ष अनुपमा मढे, रत्नाताई गवळी, कविता गोसावी, प्रिया वरपे, विनोद कासार, राजूभाऊ दोडे, सुनील बाबर, पंकज पहिलवान, प्रल्हाद कवाडे, रामभाऊ शिंदे, उमाकांत पवार, रमेश आव्हाड आदी उपस्थित होते.

राजापूर विद्यालयात कार्यक्रम : राजापूर येथील क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर या विद्यालयात लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक तुळशीराम विंचू, संचालक विजय सानप, डॉ. उमेश काळे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिंदे, जिल्हा ओबीसी सरचिटणीस राजूसिंग परदेशी, तालुका सरचिटणीस नानासाहेब लहरे, विकास सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद बोडके, परसराम दराडे, पी. के. आव्हाड, सरपंच दत्ता सानप, समाधान चव्हाण, अनिल अलगट, सचिन बैरागी, सुभाष वाघ, साईनाथ वाघ, शंकर अलगट, दिलीप अलगट, अनिल वाघ, भारत वाघ, सुभाष वाघ, शरद आगवण, शरद वाघ, नवनाथ घुगे, भाऊसाहेब बैरागी, शरद मगर, प्रवीण भाबड, निवृत्ती वाघ आदी उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हास्तरावर कबड्डी स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. स्थानिक पातळीवर विद्यालयात घेतलेल्या सर्व स्पर्धांचे बक्षीस वितरणही करण्यात आले.

मयूर मेघराज प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मयूर मेघराज यांनी लाेकेनेते मुंडे यांनी मनाेगत व्यक्त केले. यावेळी सुनील काटवे, जितेंद्र कऱ्हेकर, संजय आचारी, गणेश पवार, मयूर रुणवाल, सिद्धेश भांडगे व आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...