आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तोडफोड:तीन ते चार टवाळखोरांच्यां ग्रुप; सातपूर येथील विठ्ठल नर्सरीची टवाळखोरांकडून तोडफोड

सातपूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातपूर -त्र्यंबकेश्वर रोडवरील समृद्धी नगर जवळ असलेल्या विठ्ठल नर्सरीची शनिवारी (दि. ११) रात्री चारचाकी वाहनातून आलेल्या टवाळखोरांनी तोडफोड करून नुकसान केले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

त्र्यंबकेश्वर रोडवर समृद्धी नगर समोरील विठ्ठल नर्सरी येथे शनिवारी रात्री ३ च्या दरम्यान दोन चारचाकी वाहनातून आलेल्या तीन ते चार टवाळखोरांच्यां ग्रुपने हातात दारूच्या बाटल्या घेतलेल्या अवस्थेत विठ्ठल नर्सरी येथील प्रवेशद्वार असलेल्या गेटची नाचून नाचून तोडफोड केली. विठ्ठल नर्सरी येथील दर्शनी भागात लावलेला बॅनरही फाडला. सकाळी विठ्ठल नर्सरीचे संचालक कैलास मालूजंकर हे नर्सरीवर आले असता त्यांना नर्सरीचे मेन गेट तोडलेले दिसले. हा सर्व प्रकार येथील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. या प्रकरणी सातपूर पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...