आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सटाणा पोलिसांची कारवाई‎:गुटखा व गावठी‎ दारू अड्डे उदध्वस्त‎

सटाणा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात पोलिसांनी एका घरात छाप‎ टाकला असता गुटख्याचा ऐवज मिळून‎ आला तर तालुक्यातील चौगांव बारे‎ शिवारात गावठी दारू अड्डयावर छापा‎ टाकून भट्ट्या उध्वस्त केल्या.‎ ‎ सटाणा पोलिसांनी शहरात व‎ तालुक्यात अवैधरित्या मटका, गुटखा व‎ गावठी दारू विक्री करणाऱ्यांवर‎ छापासत्र सुरू केले आहे. यापूर्वी गुटखा,‎ दारू व गांजा साठवून ठेवणाऱ्यांवर‎ प्रभारी पोलिस निरीक्षक किरण पाटील‎ यांनी कारवाई करून मुसक्या आवळल्या‎ आहेत.

शुक्रवारी (दि. ३) सटाणा‎ शहरात एका घरात साठवलेला २७‎ हजार रुपये किमतीचा गुटखा पोलिसांनी‎ हस्तगत केला तर चौगाव बारे‎ शिवारातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी‎ सुरू असलेल्या गावठी दारूच्या भट्ट्या‎ उद‌्ध्वस्त करून संबंधितांवर कारवाई‎ केली.

यामुळे छुप्या पद्धतीने अवैध‎ व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले‎ आहे. शहर व तालुक्यात अनधिकृत‎ व्यवसाय सुरू असतील तर थेट‎ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन‎ प्रभारी पोलिस अधिकारी किरण पाटील‎ यांनी केले आहे. कारवाईत किरण‎ पाटील यांच्यासह सहायक निरीक्षक वर्षा‎ जाधव, पोलिस कर्मचारी अजय‎ महाजन, प्रकाश शिंदे, रवींद्र कोकणी,‎ हरी शिंदे, पंकज शेवाळे, विक्रम वडजे,‎ दीपक सोनवणे, महिला कर्मचारी जागृती‎ वळवी आदी सहभागी झाले.‎

बातम्या आणखी आहेत...