आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसान:इगतपुरीत मध्यरात्री बरसल्या गारा‎

घोटी24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इगतपुरी तालुक्यात‎ मध्यरात्री सोसाट्याचा वारा अन‌्‎ मेघगर्जनेसह गारांचा अवकाळी‎ पाऊस बरसल्याने रब्बी हंगामातील‎ गहू, हरभऱ्यासह उन्हाळ कांद्याचे‎ माेठे नुकसान झाले.अगाेदरच‎ संकटात असलेल्या शेतकऱ्यांना‎ अवकाळीचा तडाखा बसल्याने ते‎ हवालदिल झाले आहेत.‎ दोन तास झालेल्या मुसळधारेने‎ इगतपुरीच्या पूर्व भागातील अस्वली‎ स्टेशन, बेलगाव कुऱ्हे, नांदुरवैद्य,‎ कुऱ्हेगाव, गोंदे दुमाला, मोडाळे,‎ शिरसाठे, कुशेगाव परिसराला‎ झाेडपून काढले.

घोटी परिसरातील‎ गावांतही पावसामुळे शेतकऱ्यांची‎ तारांबळ उडाली. काढणीसाठी‎ आलेल्या गहू, हरभरा, कांदा‎ पिकांसह चाऱ्याचे नुकसान झाले.‎ जनावरांसाठी साठवलेले तणस‎ भिजल्याने वाया गेले आहे. त्यामुळे‎ शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...