आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनर्थ टळला‎‎:कापराई परिसरात गारपीट,‎ दहिवडला शाळेचे पत्रे उडाले‎

देवळा‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील पूर्व भागात चिंचबारी,‎ कापराई परिसरात गारपीट तर‎ दहिवड येथे वादळासह झालेल्या‎ बेमोसमी पावसाने जिल्हा परिषद‎ शाळेचे पत्रे उडाले असून सुदैवाने‎ अनर्थ टळला आहे.‎ तालुक्यातील अनेक गावांमध्ये‎ वादळासह पावसाचा धडाका‎ मागील ते चार दिवसांपासून सुरू‎ असून बुधवारी (दि. ८) दुपारच्या‎ सुमारास कापराई, चिंचबारी‎ परिसरात पाच ते दहा मिनिटे गारपीट‎ झाली असून येथील शेतकरी‎ हवालदिल झाला असून काढणीला‎ आलेला गहू भुईसपाट झाला आहे.‎ तसेच कांदा, उन्हाळी डोंगळे आदी‎ पिकांचे गारपिटीने नुकसान झाले‎ असून शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ‎ झाली आहे.

तालुक्यातील पूर्व‎ भागात दहिवड येथील जिल्हा‎ परिषद प्राथमिक शाळेच्या तीन‎ वर्गखाेल्यांचे व मधल्या भागातील‎‎‎‎‎‎‎‎‎‎ मोकळ्या जागेतील निम्मे पत्रे‎ वादळाने दुसऱ्या बाजूच्या पत्र्यावर‎ उलटे पडले असून सध्या मार्च‎ महिना असल्याने सकाळची शाळा‎ सुरू असल्याने दुपारी विद्यार्थी‎ शाळेत नव्हते त्यामुळे मोठा अनर्थ‎ टळला आहे. सदर घटनेची माहिती‎ स्थानिकांनी शाळेच्या शिक्षकांना‎ कळवली. शिक्षकांनी घटनास्थळी‎ हजर होत वर्गखोल्या उघडून पाहणी‎ केली असता काही वर्ग व‎ कार्यालयातील कागदपत्रे व काही‎ साहित्य ओले झाल्याचे निदर्शनास‎ आले. तसेच काही शैक्षणिक‎ साहित्यदेखील खराब झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...