आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाळेगाव औद्योगिक वसाहतीतील अतिक्रमणांविरोधात महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने कारवाई केली. बुधवारी वसाहतीच्या मुख्य मार्गावरील ५० हून अधिक अतिक्रमणे काढण्यात आली. कारखान्यांनी उभारलेल्या पार्किंग शेडचाही यात समावेश आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आला होता. औद्योगिक विकास महामंडळाचे उपअभियंता उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ११ वाजेपासून अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली. जिंदाल कारखान्याजवळील मुख्य रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत ५० हून अधिक कारखान्यांनी कंपाउंडलगत पार्किंग शेड उभारले होते.
तर बहुतांश हॉटेलचालकांनी रस्त्यापर्यंत शेड वाढवले होते. जेसीबीच्या सहाय्याने ते पाडण्यात आले. औद्योगिक वसाहतीत अनेक ठिकाणी अनधिकृत चहाची दुकाने, टपऱ्या थाटण्यात आल्या होत्या. त्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. कारखान्यांनी लावलेले फलकही रस्त्याच्या हद्दीतून काढण्यात आले. त्यामुळे भरगच्च वाटणाऱ्या मुख्य रस्त्याचा श्वास मोकळा झाला आहे. टपरीधारकांनी टपऱ्या हटवण्यासाठी वेळ देण्याची मागणी उपअभियंता उबाळे यांच्याकडे केली. अचानक झालेल्या कारवाईमुळे अनधिकृत टपरीधारकांना सावरण्याची संधी मिळाली नाही. आम्ही स्वतःहून अतिक्रमणे काढून घेतो. थोडासा वेळ देण्याची मागणी केली. तथापि, त्यास नकार देत कारवाई करण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.