आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्पर्धा परीक्षा असो किंवा कोणतेही क्षेत्र, कठोर परिश्रम हीच यशाची गुरुकिल्ली आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेस उपयुक्त विषय पदवीसाठी निवडावेत, चांगले छंद जोपासावेत व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे चांगले मित्र असल्यास कोणत्याही कठीण प्रसंगाचा सामना करता येतो, असे प्रतिपादन मुंबई येथील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे डेप्युटी चेअरमन आय.आर.एस. उमेश वाघ यांनी केले. येथील मविप्रच्या कर्मवीर आबासाहेब तथा ना. म. सोनवणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व रोटरी क्लब ऑफ सटाणा यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या इतिहास विभाग व माजी विद्यार्थी मंचद्वारा आयोजित ‘स्पर्धा परीक्षा व व्यवसाय मार्गदर्शन'' कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी मविप्रचे संचालक डॉ. प्रसाद सोनवणे, सटाणा रोटरी क्लबचे अध्यक्ष नितीन मगर, नाशिक प्रसिद्ध उद्योजक विवेक कापडणीस, उद्योजिका आशा वेणुगोपाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उद्योजक कापडणीस यांनी कोणतीही पार्श्वभूमी नसताना देखील यशस्वी उद्योजक बनता येते हे स्वत:चे उदाहरण देउन सांगितले. उद्योजक म्हणून यशस्वी होण्यासाठी अनुभवातून मिळालेले ज्ञान महत्त्वाचे असते. स्पर्धा प्रत्येक क्षेत्रात असते. स्पर्धेत संधी शोधून स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सतत अपडेट रहावे, असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. प्राचार्य डॉ. विजय मेधणे यांनी प्रास्ताविक केले, प्रा.अनिल पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर प्रा. अमित निकम यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी प्रा. अशोक डिंबर, प्रा. स्वामी पवार व प्रा.धनंजय पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.