आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आराेप:नवजात बालकाच्या मृत्यूप्रकरणी आराेग्य अधिकाऱ्यांची चिखलओहाेळ केंद्राला भेट

मालेगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिखलओहाेळ प्राथमिक आराेग्य केंद्रात मंगळवारी एक दिवसाच्या नवजात बालकाचा मृत्यू झाला. केंद्रात वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने बालकास वेळीच उपचार न मिळाल्याचा आराेप कुटूंबियांनी केला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आराेग्याधिकारी हर्षल नेहते व अतिरिक्त जिल्हा आराेग्याधिकारी युवराज देवरे यांनी बुधवारी आराेग्य केंद्राला भेट दिली.

बालकाच्या कुटूंबियांशी चर्चा करत माहिती जाणून घेतली. यासंदर्भातील अहवाल तयार करुन पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर केला जाणार आहे. मूळ शिंगणापूर (जि. परभणी) येथील रहिवासी असलेली मजूर महिला साेनाली दिलीप शिंदे हिची चिखलओहाेळ केंद्रात मंगळवारी सकाळी प्रसूती झाली. मुलगा झाल्याने हे कुटुंबीय आनंदित हाेते.

मात्र, दुपारी बालकाला झटके आले. साेनाली व तिच्या कुटुंबियांनी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवाज दिला. केंद्रात कुणी नसल्याने बाळाला वेळीच उपचार मिळाले नाही. यादरम्यान, बाळाचा मृत्यू झाला. आराेग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे बाळ दगावल्याचा आराेप करत कुटुंबियांनी संताप व्यक्त केला. या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा आराेग्याधिकारी नेहते व अतिरिक्त आराेग्याधिकारी देवरे यांनी बुधवारी दुपारी आराेग्य केंद्राला भेट दिली.

बाळाची आई साेनाली हिच्याकडून घटनाक्रम जाणून घेतला. प्रकार घडला तेव्हा अधिकारी व कर्मचारी कुठे हाेते, बाळाला उपचार का मिळाले नाही? इत्यादी माहिती त्यांनी जाणून घेतली. घटनेचा संपूर्ण चाैकशी अहवाल तयार करून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना साेपविला जाणार आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. दरम्यान, दगावलेल्या बाळाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. त्याचा व्हिसेरा तपासणीसाठी धुळे येथे पाठविण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...