आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘एकच मिशन, जुनी पेन्शन’ अशी घोषणा देत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनसाठी एल्गार पुकारला. पंचायत समिती समोर कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केले. महसूल, पंचायत समिती, शिक्षण, आरोग्य, पशू आदी विभागांतील विविध संघटनांनी एकत्रित येत तहसीलदार एकनाथ बंगाळे यांना निवेदन दिले. सिन्नर तालुका तलाठी संघटनेने निदर्शने केली. मनेगाव येथे माध्यमिक शाळेतील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केले. तालुक्यात विविध विभागांतील २००० कर्मचारी सोमवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. दरम्यान, शाळा बंद असल्याने विद्यार्थी माघारी परतले. ग्रामीण भागातील ग्रामस्थ सरकारी कामकाजासाठी महसूल, पंचायत समितीत आले होते संप असल्याने तेही मागे परतले.
जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, मुख्याध्यापक संघ, जिल्हा परिषद कर्मचारी युनियन, लेखा कर्मचारी संघटना, लिपिकवर्गीय कर्मचारी संघटना, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना, अंगणवाडी सुपरवायझर संघटना, ग्रामसेवक संघटना, विस्तार अधिकारी संघटना, वाहन चालक संघटना, सिन्नर तालुका तलाठी कर्मचारी संघटना, दिव्यांग कर्मचारी संघटना, पदवीधर शिक्षक संघटना यासह विविध संघटनांनी संपात सहभाग घेतला. आरोग्य विभागात कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कामकाज सुरू ठेवले.
..या आहेत मागण्या
२००४ पासून बंद केलेली जुनी पेन्शन याेजना लागू करावी, नवीन पेन्शन याेजना रद्द करावी, प्रदीर्घकाळ सेवेतील कंत्राटी कामगारांना समान वेतन द्यावे, काेणत्याही अटींविना अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या कराव्यात, सर्वप्रकारचे भत्ते केंद्र सरकारप्रमाणे मंजूर करावेत, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करावे, नवीन शिक्षण धाेरण रद्द करावे, आराेग्य कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे तात्काळ निराकरण करावे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.