आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसान:चांदाेरीत पिकांचे अतोनात‎ नुकसान, वीज पडून गाय ठार‎

सायखेडा21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सायखेडा, चांदोरीसह संपूर्ण‎ गोदाकाठ भागात सोमवारी पहाटे दोनपासून‎ सलग पाच तास वादळी वाऱ्यासह जोरदार‎ पाऊस झाल्याने गहू, कांद्यासह भाजीपाला‎ पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी‎ हवालदिल झाला आहे. चांदोरी येथे वीज पडून‎ गाय मृत्युमुखी पडली. अगोदर संथ पडणाऱ्या‎ पावसाने वेग पकडत जोरदार सुरुवात केली.‎ वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू होता.‎

रात्री झालेल्या पावसामुळे चांदोरी शिवारात वीज‎ पडल्याने गणेश अाहेर यांच्या गाईचा मृत्यू झाला.‎ सायखेडा परिसरात काढणीला आलेला गहू‎ आडवा पडला. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक‎ नुकसान झाले. काढणीस आलेल्या कांद्याची‎ नुकसान झाले आहे. शेतीमालाला भाव‎ नसतानाच अवकाळी पावसाने दणका दिल्याने‎ शेतकरी हताश झाला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...