आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरासरी 307.61 मिलिमीटर पाऊस:मालेगाव परिसरात दीड तास मुसळधार पाऊस

मालेगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहर परिसरात शुक्रवारी पावसाने दमदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटात सुमारे दीड तास पाऊस बरसला. आठवडाभराच्या विश्रांतीनंतर हजेरी लावणाऱ्या पावसामुळे खरिपाच्या पिकांना दिलासा मिळाला आहे. तालुक्यात आत्तापर्यंत एकूण सरासरी ३०७.६१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. मागील दाेन दिवसांपासून वातावरणात उष्णता वाढली हाेती.

दुपारी चटका देणारे ऊन पडत आहे. तर सायंकाळनंतर ढगाळ वातावरणाची निर्मिती हाेत आहे. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता पावसाला सुरुवात झाली. टपाेऱ्या थेंबांसह सुरू झालेला पाऊस सलग दीड तास बरसला. खरिपाच्या पिकांना ऐन उमेदीच्या काळात पाणी मिळाले आहे.

बातम्या आणखी आहेत...