आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोल कोसळले:इगतपुरीत मुसळधार, अनेक ठिकाणी विद्युत पोल कोसळले

इगतपुरी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवारी दुपारी मुसळधार पाऊस झाला. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी झाडे, विद्युत पोल कोसळले. नगरपरिषदरोड, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे वाचनालय, जैन मंदिर, तीन लकडी, गावठा, साई कुटीर इत्यादी भागात झाडे व विद्युत पोल कोसळले आहेत.

काही ठिकाणी विद्युतवाहक तारा गाड्यांवर पडल्या. महावितरणने काही तास अगोदरच दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. यासाठी वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, नगरपरिषद व महावितरणचे कर्मचाऱ्याकडून झाडे व पडलेले विद्युत पोल बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते.

बातम्या आणखी आहेत...