आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाचा फटका:नामपूर परिसरात दुसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस, घरे पडली, शेतातील माती गेली वाहून; पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला

नामपूर2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथे व परिसरात बुधवार व गुरुवारी जोरदार पाऊस झाला. दोन मातीच्या घरांची पडझड झाली. चाळीत पाणी शिरल्याने कांद्याचे नुकसान झाले आहे. तर शेतातील माती वाहून गेल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केलेले बियाणे वाया गेले आहे.

बुधवारी दुपारी झालेल्या पावसामुळे शेताचे व पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यात गुरुवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. शेतात पेरलेला मका, बाजरी उगवण्याआधी माती वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे बियाणे वाया गेले आहे. शेतातील चाळीत पाणी शिरल्याने कांद्याचे नुकसान झाले. भूमिगत गटारी तुबंल्याने रस्त्यावर पाणी साचले होते. पावसामुळे दोन मातीच्या घरांची पडझड झाली आहे. बुधवारी झालेल्या पावसाचे पाणी शेतातील तसेच असताना सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने हजेरी लावल्याने पेरणी लांबणीवर पडणार आहे. नाले तुडुंब भरून वाहत आहे. दमदार पावसामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे.

बुधवारपासून वीजपुरवठा खंडित
बुधवारी दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या जाेरदार पावसामुळे काही विजेच्या तारांवर झाडे पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यात गुरुवारी पुन्हा पाऊस झाल्याने वीजपुरवठा गुरुवारी रात्रीपर्यंत सुरळीत होऊ शकलेला नव्हता. तुटलेल्या तारा जोडणीचे काम महावितरणकडून सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...