आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:नमस्ते नाशिक तर्फे 89 विद्यार्थ्यांना मदत‎

नाशिक11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नमस्ते नाशिक फाउंडेशनतर्फे‎ मखमलाबाद गावातील सह्याद्री‎ शिक्षण प्रसारक समाज विकास‎ मंडळ नाशिक संचलित जागृती‎ श्रवण विकास विद्यालयातील ८९‎ विद्यार्थ्यांना श्रवण दिनानिमित्त‎ किराणा साहित्य देत मदतीचा हात‎ देण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी‎ विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित‎ होते.‎ नमस्ते नाशिक फांडेशनच्या‎ वतीने विविध सामाजिक, शैक्षणिक‎ उपक्रम राबविले जातात.

यावेळी‎ अध्यक्ष स्नेहल देव, अॅड. उज्ज्वला‎ पाटील, सुवर्णा सायंकर, शामकांत‎ भोंगे, ऱ्हिदम देव, संदीप देव, शाळेचे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ मुख्याध्यापक महेंद्र वाघमोडे आदी‎ उपस्थित होते. संस्थेच्या वतीने‎ शाळेला कडधान्य तसेच किराणा‎ साहित्य देण्यात आले. मुख्याध्यापक‎ महेंद्र वाघमोडे यांनी १९९८ पासून‎ मखमलाबाद येथे शाळा कार्यरत‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ असून सध्या शाळेत ८९ विद्यार्थी‎ शिक्षण घेत असल्याचे सांगितले.‎ संस्थेला जेव्हा जेव्हा मदतीसाठी‎ आवाज दिला जातो तेव्हा तात्काळ‎ आम्हाला मदत उपलब्ध होते, असे‎ वाघमोडे यांनी सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...