आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानूर ते चणकापूर हुतात्मा स्मारक तिरंगा रॅली:मार्कंडेय पर्वतावर हेरिटेज वाॅक

कळवण3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उपविभागीय कार्यालय, तहसील व पंचायत समितीच्या वतीने प्रांताधिकारी विकास मीणा, तहसीलदार बंडू कापसे, गटविकास अधिकारी डॉ. नीलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मार्कंडेय पर्वतावर हेरिटेज वाॅकचे आयोजन करण्यात आले होते. विविध शासकीय, जिल्हा परिषद, महसूल आदींसह रोटरी क्लब व नागरिक अशा एक हजारांपेक्षा जास्त लोकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवून भरपावसात मार्कंडेय पर्वतावर तिरंगा फडकवला. पंचायत समितीच्या वतीने मानूर येथील प्रशासकीय इमारत ते चणकापूर हुतात्मा स्मारक तिरंगा रॅली गटविकास अधिकारी डॉ. नीलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली. यावेळी पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी, ग्रामसेवक, संगणक परिचालक, ग्रामरोजगार सेवक व ग्रामपंचायत कर्मचारी दुचाकीवर तिरंगा लावून रॅलीत सहभागी झाले हाेते.

तिरंगा रॅलीचे अभोणा येथे येथील मुख्याध्यापक विकेश बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली अभिनव शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले. चणकापूर हुतात्मा स्मारक येथे ग्रामपंचायत चणकापूरचे सरपंच ज्ञानदेव पवार, ग्रामसेवक आर. यू. महाजन व नागरिकांनी तिरंगा रॅलीचे स्वागत केले. यावेळी तहसीलदार बंडू कापसे, सहायक पाेलिस निरीक्षक नितीन शिंदे यांनीही सहभाग घेतला. पंचायत समितीच्या वतीने नवी बेज येथे क्रिकेट स्पर्धाचे आयोजन अधिकारी व कर्मचारी वर्गासाठी करण्यात आले. यावेळी ग्रामसेवक, संगणक परिचालक, ग्रामरोजगार सेवक व पंचायत समितीच्या कर्मचारी वर्गाने सहभाग नोंदविला. यासाठी नवी बेज संघाचे शरद निकम व महेंद्र देवरे यांचे सहकार्य लाभले.

बातम्या आणखी आहेत...