आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य सरकार:हिंदूहृदयसम्राट ठाकरे मनमाड-करंजवण योजनेचे 40 काेटी राज्य सरकार भरणार

मनमाड6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील जनतेला न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री म्हणून आता माझी मोठी जबाबदारी आहे. मनमाडसह नांदगाव तालुक्यातील जनतेचे प्रश्न आणि विकासाच्या योजना पूर्ण करण्यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासणार नाही. मनमाडकरांसाठी संजीवनी ठरणाऱ्या ३११ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मनमाड करंजवण पाणीपुरवठा योजना असे नाव देऊन यासाठी नगरपालिकेला भरावयाचे ४० कोटींची लोकवर्गणी पालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने नगरविकास विभाग भरेल. ही महत्त्वपूर्ण घोषणाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.

मनमाडच्या एकात्मता चौकात झालेल्या सभेस नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे, माजी कृषिमंत्री दादा भुसे, माजी उच्च तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, राजाभाऊ भाबड, अंजूम कांदे, राजाभाऊ देशमुख, राजेश कवडे, विलास आहेर व्यासपीठावर उपस्थित होते. शिंदे यांचे मनमाडमध्ये आगमन होताच ढोल-ताशांच्या गजरात आणि पुष्पवृष्टी करत जल्लोषात स्वागत करण्यात आले. पाण्यासाठी कायम तहानलेल्या मनमाडसाठी संजीवनी ठरलेल्या ३११ कोटी रुपये खर्चाच्या योजनेचे करंजवण पाणी योजनेची निविदा प्रसिद्धी केली. व मनमाड पाणीपुरवठा योजनेला मंजुरी आणि टेंडर मंजूर केल्याने उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.

जनतेच्या आशीर्वादामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांची आशीर्वादाची जोड मिळाली. त्यातून पुढील वाटचाल करणार आहोत. आता भाजप-सेना युतीचे सरकार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सरकारचे भक्कम पाठबळ असल्यामुळे भविष्यात विकासकामाला पैसे कमी पडणार नाही, असे ते म्हणाले. आमदार सुहास कांदे आपल्याकडे जनतेची कामे घेऊन येतात. त्यांच्या पाठपुराव्यांमुळे कोट्यवधी रुपयांच्या योजनांना मंजुरी मिळाली, अशा शब्दात त्यांनी कांदे यांच्या कार्याचा गौरव केला. विविध संस्था, संघटनांतर्फे मुख्यमंत्र्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. सर्वधर्मीय गुरूंच्या उपस्थितीत मनमाडच्या पाणी योजनेसह तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांचे टेंडर प्रकाशित करण्यात आले.

प्रारंभी आमदार कांदे यांनी तालुक्यातर्फे मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला. करंजवणसह तालुक्यातील पाणी योजना, राष्ट्रीय पुरुषांचे पूर्णाकृती पुतळे, शिवस्मारक व डॉ आंबेडकर स्मारकासाठी जागा व निधीच्या प्रश्नांचा उहापोह केला. कार्यक्रमाला मनमाडसह नांदगाव तालुक्यातून नागरिक, महिला, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते माेठ्या संख्येने उपस्थित होते. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर २५० अतिरिक्त पोलिस व चार वरिष्ठ अधिकाऱ्यांचा बंदाेबस्त तैनात केला हाेता.

शाळांची दुरुस्ती करा, रस्ते चकाचक करा, निधी कमी पडणार नाही
नांदगाव मतदारसंघाच्या विकासासाठी आमदार सुहास कांदे यांच्यासह आपण कटिबद्ध आहोत. मनमाड पालिकेच्या सर्व शाळांची दुरुस्ती करा, रस्ते चकाचक करा तुम्हाला निधी कमी पडणार नाही. असेच प्रेम आणि साथ असू द्या, अशी भावनिक साद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनमाड येथे प्रचंड जनसमुदायाला घातली.

बातम्या आणखी आहेत...