आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वतःचे अपयश लपविण्यासाठी काही जणांनी जाती-धर्मात दरी निर्माण करण्याचे राजकारण सुरू केले आहे. सर्वधर्मीय एकता ही देशाची खरी ताकद अाहे. आपल्यात द्वेष निर्माण करणाऱ्यांना हिंदू-मुस्लिम जनतेने आपला भाईचारा कायम ठेवत चोख प्रत्युत्तर देण्याची गरज आहे, असे विचार महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.
रमजान ईदनिमित्त येथील काँग्रेसचे नेते नगरसेवक एजाज बेग यांनी अमन चौकात आयोजित केलेल्या ईद मिलन कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना मंत्री थोरात बोलत होते. ते म्हणाले की, काँग्रेसची विचारधारा सर्वांना सोबत घेऊन चालण्याची आहे. देशाच्या विकासासाठी ही विधारधाराच महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे जातीधर्मात विष कालवण्याचा होत असलेला प्रयत्न देशासाठी निश्चितच गंभीर असल्याने नागरीकांनीच अशा लोकांपासून सावध राहावे. कार्यक्रमाच्या ठिकाणी आम्ही येत असताना रस्त्यातील खड्ड्यांमुळे स्पीड ब्रेकरची गरज नसल्याचे दिसून आले. हे चित्र बदलण्यासाठी काँग्रेस हाच पर्याय आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
मालेगाव, भिवंडीच्या विकासासाठी अभ्यास समिती
यंत्रमाग उद्योग-कामगारांना ताकद देण्यासाठीच राज्य शासन टेक्स्टाइल उद्योगाला चालना देत आहे. इचलकरंजीप्रमाणेच मालेगाव, भिवंडीचा विकास व्हावा, या दृष्टिकोनातून अभ्यास समितीचा अहवाल आल्यावर यंत्रमागधारकांबरोबर बसून योजना तयार केल्या जातील, अशी ग्वाही वस्त्रोद्योगमंत्री असलम शेख यांनी यावेळी बोलताना दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.