आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:हिंदू-मुस्लिम जनतेने भाईचारा कायम राखावा; काँग्रेसच्या ईद मीलन कार्यक्रमात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

मालेगाव15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वतःचे अपयश लपविण्यासाठी काहीजणांनी जाती-धर्मात दरी निर्माण करण्याचे राजकारण सुरू केले आहे. सर्वधर्मीय एकता ही देशाची खरी ताकद असल्याने व्देष निर्माण करणाऱ्यांना हिंदू-मुस्लिम जनतेने आपला भाईचारा कायम ठेवत चोख प्रत्युत्तर देण्याची गरज आहे, असे विचार महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

रमजान ईदनिमित्त येथील काँग्रेसचे नेते नगरसेवक एजाज बेग यांनी अमन चौकात आयोजित केलेल्या ईद मीलन कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख, आमदार अमीन पटेल, प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, प्रसाद हिरे, डॉ. मंजूर अय्युबी, जमील क्रांती, डॉ. राजेंद्र ठाकरे, साजीद अन्सारी, जैनू पठाण, सतीश पगार आदी उपस्थित होते.

मंत्री थोरात म्हणाले, काँग्रेसची विचारधारा सर्वांना सोबत घेऊन चालण्याची आहे. त्यामुळे जातीधर्मात विष कालवण्याचा होत असलेला प्रयत्न देशासाठी निश्चितच गंभीर असल्याने नागरिकांनीच अशा लोकांपासून सावध रहा. कार्यक्रमाच्या ठिकाणी आम्ही येत असताना रस्त्यातील खड्डयांमुळे स्पिडब्रेकरची गरज नसल्याचे दिसून आले. हे चित्र बदलण्यासाठी काँग्रेस हाच पर्याय आहे हे लक्षात घेतले पाहिजे. विकासाच्या मुद्द्यावर जनता पुन्हा काँग्रेससोबत येत असल्याने आगामी मनपा निवडणुकीनंतर महापौर काँग्रेसचा होईल, असा विश्वास मंत्री थोरात यांनी व्यक्त केला.

यावेळी आमदार अमीन पटेल, आमदार सुधीर तांबे आदींची भाषणे झाली. नगरसेवक एजाज बेग यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान हेलिकॉप्टरने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख, आ. अमीन पटेल, आ. सुधीर तांबे आदी नेत्यांचे कॉलेज मैदानावर आगमन झाले. यावेळी महसूल विभागातर्फे अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे, प्रांत विजयानंद शर्मा, तहसीलदार चंद्रजित राजपूत यांच्यासह काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, प्रसाद हिरे, एजाज बेग, जमील क्रांती, डॉ. मंजूर अय्युबी, अनिता अवस्थी आदी पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देत स्वागत केले.

बातम्या आणखी आहेत...