आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनजागृती‎:पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात‎ केली तंबाखूजन्य पदार्थांची होळी‎

सिन्नर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎पाडळी येथील पाताळेश्वर‎ माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांनी‎ व्यसनमुक्ती जनजागृतीसाठी‎ तंबाखू, गुटखा, मावा, बिडी,‎ सिगारेट अशा तंबाखूजन्य पदार्थांची‎ होळी केली. गावातून तंबाखूचे पुडे,‎ सिगारेटची पाकीट, बिड्यांचे पाकीट‎ व यासारखा कचरा जमा केला.‎ बाल विज्ञान विकास शिक्षण‎ प्रसारक संस्थेचे सचिव व‎ विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. बी.‎ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली‎ अमली पदार्थापासून होणारे‎ दुष्परिणाम विद्यार्थ्यांना सांगून‎ विद्यार्थ्यांत व पालकांत जनजागृती‎ केली.‎

विद्यार्थ्यांनी कुटुंबातील कोणालाही‎ कोणत्याही तंबाखूजन्य पदार्थांचा‎ अवलंब करू देणार नाही, अशी‎ प्रतिज्ञा केली.‎ संस्थेचे कोषाध्यक्ष टी. के. रेवगडे,‎ बी. आर. चव्हाण, आर. व्ही.‎ निकम, एस. एम. कोटकर, आर.‎ टी. गिरी, एम. सी. शिंगोटे, एम. एम.‎ शेख, सविता देशमुख, सी. बी.‎ शिंदे, के. डी. गांगुर्डे, एस. एस.‎ पाटोळे, आर. एस. ढोली, ए. बी.‎ थोरे उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...