आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन आयोजित महिला डॉक्टरांच्या हळदी-कुंकूनिमित्त झालेल्या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे गुणदर्शन महिला डॉक्टरांनी सादर करून या कार्यक्रमाचा आनंद घेतला. प्रजासत्ताक दिनी येथील आसरा लॉन्स येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात कर्तृत्ववान महिला डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. नियोजन डॉ. दीपाली क्षत्रिय, स्त्रीराेगतज्ज्ञ संगीता पटेल,डॉ. स्वाती सोनवणे यांनी केले तर स्त्री रोग तज्ञ डॉ. कविता दराडे यांचे सहकार्य लाभले.
तेजस्वी जेजूरकर व रितुषा जेजूरकर या बहिणींनी ‘वक्रतुंड एकदंताय’ या गणेशवंदना गीतावर सुंदर नृत्य सादर करत कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. डॉ. दीपाली क्षत्रिय व कर्मचाऱ्यांनी ‘माेहे मोहे तू रंग दे बसंती’ या गाण्यावर दिलखेचक समूहनृत्य सादर करून वाहवा मिळविली.
बालकलाकार आराध्या काटे या चिमुरडीने वेड लागले या गाण्यावर अप्रतिम नृत्य केले तर डॉ.विद्या चौधरी यांनी देखील नृत्याविष्कार सादर केला. डॉ. स्वाती सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले . सूत्रसंचालन डॉ. रंजना काटे यांनी केले. यानिमित्ताने हळदीकुंकू व संक्रात वाणांचे वाटप करण्यात आले. तसेच महिलांच्या झालेल्या उखाणा स्पर्धा ही रंगल्या. यात डॉ. जयश्री जाधव यांनी प्रथम क्रमांक मिळविला. लता क्षत्रिय, प्रियंका काकड, डॉ. गीतांजली सोनवणे, डॉ. मनीषा वाघ, डॉ. मनीषा गोसावी, शुभा पैठणकर, शीतल भागवत, प्रीती शिंदे, भारती विंचू, राधिका गायके, पौर्णिमा करवा, राजश्री गहलोत, कांबळे, करिष्मा सोनवणे उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.