आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मान‎:‘शिवशौर्य’च्या गिर्यारोहक‎ महिलांचा सन्मान‎

घोटी‎19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

समाजाच्या विकासाच्या प्रक्रियेत‎ सावित्रीच्या लेकी आपल्यापरीने‎ वेगवेगळ्या क्षेत्रात आपले कार्य,‎ कर्तृत्व सिद्ध करीत आहेत. अशाच‎ गिर्यारोहक साहसी महिला सातत्याने‎ विविध प्रकारचे अवघड शिखरे,‎ गडकोट, दऱ्याखोऱ्या सर करणाऱ्या‎ मुंबईच्या शिवशौर्य ट्रेकर्सच्या महिला‎ भगिनींनी जागतिक महिला दिनाच्या‎ पूर्वसंध्येला राज्यातील सर्वोच्च‎ शिखर सर केले.‎

त्यांच्या साहसी कार्याची दखल घेत‎ कै. मुरलीधर गोटू कोतकर‎ सेवाभावी संस्था, नाशिक आणि‎ इगतपुरी तालुक्यातील कळसुबाई‎ मित्र मंडळ यांच्या संयुक्त‎ सहकार्याने शिवशौर्य ट्रेकर्सच्या‎ साहसी गिर्यारोहक महिला भगिनींना‎ सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ, शाल,‎ श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.‎ यावेळी कै. मुरलीधर गोटूजी‎ कोतकर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष‎ लक्ष्मीकांत कोतकर, कळसुबाई मित्र‎ मंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे,‎ शाहीर बाळासाहेब भगत, तुकाराम‎ धांडे, राम खुर्दळ, भूपाल देशमुख,‎ वैजयंती सिन्नरकर, नम्रता सावंत,‎ आदिती काटकर, शुभदा वर्तक,‎ अंजना प्रधान, भटू कोतकर, देवांग‎ जानी, अभिजित कुलकर्णी, सागर‎ बोडके, बाळासाहेब आरोटे, गजानन‎ चव्हाण, अशोक हेमके, काळू भोर,‎ गोकुळ चव्हाण, सुरेश चव्हाण,‎ रमेश हेमके, सोमनाथ भगत, उमेश‎ दिवाकर, प्रविण भटाटे, नितीन‎ भागवत, नीलेश पवार आदींसह‎ ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी‎ झाले होते.‎

बातम्या आणखी आहेत...