आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हल्ला:हल्ल्याच्या घटनांमुळे रुग्णालयात ; सामान्य रुग्णालयात 24 तासपोलिस बंदोबस्त

मालेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर २४ तासपोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. रुग्णालय आवारात कायमस्वरूपीपोलिस चौकी कार्यान्वित करून येथे किमान दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती अपरपोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी दिली.

रविवारी (दि. ५) रात्री सामान्य रुग्णालयात डॉ. अभयपोतदार यांच्यावर एकाने कटरने हल्ला केला होता.डॉ.पोतदार यांनी समयसूचकता दाखवत हल्लेखोराचा हात पकडल्याने त्यांना किरकोळ जखम झाली होती. वारंवार वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ले होत आहेत. त्यामुळे कायमस्वरूपीपोलिस चौकी कार्यान्वित करून कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची मागणी करत रुग्णालयाचे उपअधीक्षक डॉ. हितेश महाले यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी सोमवारी खांडवी यांची भेट घेतली होती.

हल्ल्याच्या घटनांमुळे रुग्णालयात कर्मचारी दबावाखाली काम करतात, त्यांच्या मनात नेहमीच धास्ती असते. याचा परिणाम रुग्णसेवेवर होतो. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य उपाययोजना करण्याची मागणी डॉ.महाले यांनी केली होती. त्यानुसार खांडवी यांनी तातडीनेपोलिस चौकी कार्यान्वित करण्याचे आश्वासन दिले. सध्या शहरपोलिस ठाण्याचा एकच कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात असतो. त्यांच्या मदतीला दररोज इतरपोलिस ठाण्यातून एक कर्मचारी हजर राहील. बुधवारपासून दोन कर्मचारी २४ तासांसाठी तैनात ठेवले जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...