आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:सुदृृढ आराेग्यासाठी धावल्या‎ शेकडाे महिला अन् तरुणी‎

मालेगाव‎18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून‎ राेटरी क्लब मालेगाव फाेर्टने रविवारी‎ (दि.५) आयाेजित केलेल्या महिला‎ मॅरेथाॅनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ८००‎ महिला व तरुणींनी मॅरेथाॅनमध्ये सहभाग‎ घेत तीन गटांमध्ये धावत सुदृढ आराेग्याचा‎ संदेश देत महिला सशक्तीकरण व‎ सबलीकरणाचा जागर केला.‎ सकाळी सहा वाजता पालकमंत्री दादा‎ भुसे यांच्या हस्ते क्रीडा संकुलापासून‎ मॅरेथाॅनचा शुभारंभ करण्यात आला. ३, ५‎ व दहा किलाेमीटर अंतराच्या तीन गटांमध्ये‎ स्पर्धा झाली. महिला स्पर्धकांनी अहिंसा‎ सर्कल, महात्मा गांधी पुतळा, माेसमपूल,‎ एकात्मता चाैक, रावळगाव नाका, चर्चे‎ गेट मार्गे पुन्हा क्रीडा संकुल अशा मार्गे‎ धावत स्पर्धा पूर्ण केली. स्पर्धेच्या मार्गावर‎ नागरिकांनी पाणी व गाेळ्यांचे वाटप केले.‎ रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून महिलांना‎ प्राेत्साहन देत नारी शक्तीचा जल्लाेष‎ केला. स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह व‎ प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.‎

तर प्रत्येक सहभागी स्पर्धकांना पदक व‎ प्रमाणपत्र देण्यात आले. मंत्री भुसे यांनी‎ मॅरेथाॅन आयाेजकांचे काैतुक केले. आज‎ सर्वच क्षेत्रांमध्ये महिला कार्यरत आहेत.‎ दैनंदिन जीवनातील जबाबदाऱ्या पार‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ पाडताना त्यांचे आराेग्याकडे दुर्लक्ष हाेते.‎ मॅरेथाॅनच्या माध्यमातून महिलांना‎ आराेग्याकडे लक्ष देण्याची व आपली‎ क्षमता ओळखण्याची संधी मिळाली आहे.‎ महिलांनी आराेग्य जपावे असा सल्ला देत‎ मंत्री भुसे यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा‎ दिल्या. विशेष सरकारी वकील शिशिर हिरे‎ यांनी मॅरेथाॅन आयाेजनाची माहिती दिली.‎ राेटरी फाेर्टचे अध्यक्ष अॅड. नीलेश पाटील‎ यांनीही मनाेगत व्यक्त केले.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ याप्रसंगी अपर पाेलिस अधीक्षक अनिकेत‎ भारती, महाराष्ट्र बँकेचे अधिकारी श्रीराम‎ भाेर, शरद दुसाने, राेटरीच्या सचिव‎ कविता कासलीवाल, प्रकल्पप्रमुख‎ परिक्षित पवार, पंकज विभुते,‎ विजयालक्ष्मी अहिरे, शिल्पा देशमुख,‎ गितांजली बाफना, मानसी महाजन,‎ किशाेर कुटमुटिया, दिलीप ठाकरे, सर्जेराव‎ पवार, सागर लाेणारी आदींसह पदाधिकारी‎ उपस्थित हाेते.‎

या विजेत्यांचा गाैरव‎
श्रद्धा पवार, हर्षिता कांनाेर, साेनाली शेलार, गीता तेलरांधे, भावना निकम, दिशा निकम,‎ ऊर्मिला पवार, अश्विनी घाेंगडे, भाग्यश्री निकम, डाॅ. उज्ज्वला देवरे या विजेत्यांना‎ सन्मानित करण्यात आले. मॅरेथाॅनच्या प्रारंभी डाॅ. उज्ज्वल कापडणीस यांनी गाण्याच्या‎ तालावर स्पर्धकांकडून स्पीड याेगा करून घेतले.

बातम्या आणखी आहेत...