आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीका:मागण्यांची दखल न घेतल्यास बुधवारी महापालिका प्रवेशद्वारावर बोकडबळी

मालेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका कार्यक्षेत्रात कुसुंबारोडवर एका बालकाचा बळी गेल्यानंतर अतिक्रमणांविरोधात मोहीम राबविण्यात आली. बळी गेल्याशिवाय कामे होत नाहीत, ही पालिकेला झालेली भूतबाधा असल्याची टीका सार्वजनिक नागरी सुविधा समितीने केली आहे. समितीने केलेल्या प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी पालिकेच्या प्रवेशद्वारावर बोकडबळी दिला जाणार आहे, अशी माहिती समिती सदस्यांनी दिली.

समितीने केलेल्या मागण्यांवर प्रशासनाने मंगळवार (दि. ८)पर्यंत सुरुवात न केल्यास बुधवारी सकाळी ११ वाजता बोकडाचा बळी देण्याचा इशारा समितीचे अध्यक्ष रामदास बोरसे, उपाध्यक्ष भरत पाटील, कैलास शर्मा, जितेंद्र देसले, जगदीश भुसे, क्रांती पाटील, फारुख कच्छी, गोपाळ सोनवणे, भालचंद्र खैरनार, नरेंद्र साखला, पवन पाटील, राजेंद्र तिवारी, नीलेश पाटील, शंकर वाघ, माजिद मन्सुरी, संदीप अभोणकर, दीपक पवार, अशोक जाधव, देवीदास पाटील आदींनी दिला आहे.

..या आहेत प्रलंबित मागण्या
सरदार मार्केटजवळ रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे, शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे, सकाळी व संध्याकाळी डेंग्यू प्रतिबंधक जंतूनाशक औषधांची फवारणी करणे, मोकळ्या भूखंडधारकांना नोटीस बजावून सर्व भूखंड साफ करणे, बेकायदेशीर कत्तलखान्यातील रक्तमिश्रित पाण्याचा बंदोबस्त करणे, रस्ता लगत असलेल्या अतिक्रमित टपऱ्या काढणे, सरदार चौकातील अतिक्रमण निष्कासित करणे, रामसेतू व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुलावरील ठेलागाडी व बेकायदेशीर पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई करणे.

बातम्या आणखी आहेत...