आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहराचे अर्थकारण हे यंत्रमाग व्यवसायावर निर्भर आहे. हा व्यवसाय वाचला तर शहर वाचेल. खासगी कंपनीच्या मनमानीविराेधात सुरू असलेला लढा राजकारणाचा भाग नाही. कुणी पाठीवर मारले तर सहन करू, मात्र पाेटावर माराल तर याद राखा, अशा कडक शब्दांत आमदार मुफ्ती माेहम्मद इस्माईल यांनी मालेगाव पाॅवर सप्लाय लिमिडेट या खासगी वीज कंपनीला इशारा दिला.
वीजप्रश्नाच्या विविध मुद्द्यांवर चर्चेसाठी साेमवारी रात्री लाेट्स हाॅलमध्ये यंत्रमाग व्यावसायिक व राजकीय प्रतिनिधींची संयुक्त बैठक झाली. या बैठकीस आमदार मुफ्ती यांनी मार्गदर्शन केले. भिवंडी शहरातही खासगी कंपनी काम करत आहे. परंतु, तिथे कंपनीचा मनमानी कारभार दिसत नाही. मालेगाव शहरात कंपनी मनमानी व बेजबाबदारपणे कामकाज करत आहे.
कन्झुमर असाेसिएशन विजेसंदर्भातील अडचणी व समस्या साेडविण्यासाठी पाॅवर कन्झुमर असाेसिएशनची स्थापना करण्यात आली. यात बुनकर असाेसिएशन, मालेगाव पाॅवरलूम संघर्ष समिती, अन्सारी माेमीन जुलाह काॅन्फरस संघटना, बुनकर बेदारी कमिटी, द्याने पाॅवरलूम संघर्ष समिती, दरेगाव पाॅवरलूम संघर्ष समिती, पाॅवरलूम अक्शन कमिटी, द्याने तहाफूज-ए-पाॅवरलूम अॅक्शन कमिटी, पाॅवरलूम उद्याेग विकास समिती, म्हाळदे पाॅवरलूम उद्याेग विकास समिती, पाॅवरलूम ओनर असाेसिएशन व रियल पाॅवरलूम ओनर असाेसिएशन या संघटना प्रतिनिधींचा समावेश आहे.
..या आहेत प्रमुख मागण्या नवीन यंत्रमाग व्यावसायिकांना तातडीने वीजजाेडणी द्यावी, फाॅल्टीच्या नावाने नवीन मीटर बसविणे बंद करावे, सरासरी वीजबिलांची वसुली करू नये, फाॅल्टी व ओव्हरलाेड बिलांच्या नावाखाली हाेणारी अतिरिक्त कर वसुली थांबवावी, करानुसार दरवर्षी २० काेटी रुपये मेंटेनन्सवर खर्च करावा, मनमानीपणे हाेणारे भारनियमन तत्काळ थांबवावे, कंपनीचे कार्यालय शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सुरू करावे आदी मागण्या मांडल्या आहेत. दाेन दिवसांत पाेलिस अधीक्षक शहाजी उमाप यांची भेट घेऊन चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.