आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइगतपुरी तालुका खरेदी विक्री संघांची निवडणूक माघारीच्या दिवशी अविरोध झाली. पनास वर्षात पहिल्यांदाच खरेदी विक्री संघाची निवडणूक अविरोध झाली आहे. तालुका खरेदी विक्री संघासाठी एकूण १७ जागेंसाठी ५१ अर्ज आले होते. त्यामध्ये ३४ उमेदवारांनी गुरुवारी माघार घेतल्याने १७ जागा अविरोध झाल्या आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय गायकवाड यांनी दिली आहे.
विशेष म्हणजे गेल्या चाळीस ते पन्नास वर्षात डबघाईस गेलेल्या संघाचे रुपडे बदलवणारे खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाने यांची दुसऱ्यांदा अविरोध निवड झाली आहे, दरम्यान त्यांच्या विरोधात एक ही अर्ज नसल्याने ते निवडणूक प्रक्रियेत ते यापूर्वीच विजयी होते. अविराेध निवडीसाठी माजी आमदार शिवराम झोले, जिल्हा नेते अॅड. संदीप गुळवे, जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाने, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव यांनी नेतृत्त्व केले आहे. यावेळी माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, रमेश जाधव, कचरू डुकरे, भाऊसाहेब खातळे आदी उपस्थित होते.
अविराेध निवड झालेले सदस्य
माजी आमदार शिवराम झोले, ज्ञानेश्वर लहाने, सुनीता गुळवे, आशाबाई देवगिरे, सुनील जाधव, बेलगाव तऱ्हाळे सोसायटीचे अध्यक्ष समाधान वारुंगसे, पांडुरंग खातळे, अरुण गायकर, जयराम धांडे, प्रकाश गव्हाणे, देविदास जाधव, संजय जाधव, अनिल तोकडे, रमेश धांडे, देवराम म्हसने, मोहन भोर, भरत कातोरे यांची निवड झाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.