आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:सोमठाणे शिवारात अवैध दारूसाठा जप्त; दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत

सिन्नरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील सोमठाणे-चासनळी रस्त्यावर सोमठाणे शिवारात नाशिक उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारूसाठा व वाहतूक करणारे वाहन असा एक लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आला.

नाशिक उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने वावी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सोमठाणे गावच्या शिवारात रात्री गस्त घालत असताना गावानजीक सेन्ट्रो कार (एमएच १५, एएस ४१२४)ची तपासणी केली. गाडीत देशी दारूच्या १८० मिलिच्या ६२४ सीलबंद बाटल्या (१३ बॉक्स), तर ९० मिलिच्या १०० सीलबंद बाटल्या (१ बॉक्स) मिळून आल्या. कृष्णा रामभाऊ धोक्रट (२८, रा. सोमठाणे) या चालकाला दारूची अवैध वाहतूक करताना आढळून आल्याने ताब्यात घेण्यात आले. दारू वाहतूक करण्यासाठी वापरात आलेले वाहन व दारूसाठा मिळून एकूण एक लाख ९० हजार ४४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत नाशिक उत्पादन शुल्कचे अधीक्षक शशिकांत गर्जे, प्रभारी उपअधीक्षक हर्षवर्धन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक जयराम जाखेरे, दुय्यम निरीक्षक रोहित केरीपाळे, राहुल राऊळ, जवान सुनील दिघोळे, धनंजय पवार, राहुल पवार, महेंद्र भोये, अनिता भांड आदींच्या पथकाने ही कारवाई केली.