आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजानोरी येथे गाळ्यांमध्ये प्रतिबंधित पानमसाल्याचा २० लाखांचा साठा हस्तगत करण्यात आला आहे. यामुळे पुन्हा एकदा येथील औद्योगिक वसाहतीत सुरू असणाऱ्या अवैध धंद्याची चर्चा झाली.औद्योगिक वसाहतीमध्ये कोणत्या व्यवसायासाठी परवानगी घेतली व प्रत्यक्षात तेथे कोणता व्यवसाय चालतो, याविषयी खात्री करण्यासाठी गुरुवारी सरपंच सुभाष नेहरे, उपसरपंच हर्षल काठे, सदस्य विलास काठे गेले असता आशापुरा गोदामातील गाळा नं. ३० मध्ये तंबाखूजन्य अवैध साठा असल्याचे निदर्शनास आले. याबाबत विचारणा केली असता गाळ्यातील दोन कामगारांनी तेथून पळ काढला.
दिंडोरी पोलिसांना कळविले. यावेळी निरीक्षक प्रमोद वाघ, उपनिरीक्षक पांडुरंग कावळे, अरुण आव्हाड, धुमाळ, कावळे तत्काळ दाखल झाले. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकही दाखल झालेे. माणिकचंद मीनीचे ४६०० पॅकेज, गोवा १००० चे ४५५ पॅकेज, माणिकचंद पानमसाल्याचे १००० पॅकेज, एमसी सुगंधी तंबाखू १०४० पॅकेज असे एकूण १९ लाख ४६,४०० किमंतीचा प्रतिबंधित पानमसाला गाळ्यांमध्ये विक्रीसाठी साठा करताना मिळून आल्याने शनी हनुमान गुप्ता (रा. व्हिलेज कयामुद्दीनपूर, पो. छापर सुलतानापूर, उत्तर प्रदेश) व प्रदीप शर्मा (रा. मुंबई) या संशयितांवर दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.