आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांचा ठिय्या:दीक्षीत अवैध दारू विक्री, रस्त्यावर बाटल्या फाेडत महिलांचा ठिय्या

ओझर9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दीक्षी गावात अवैध दारू विक्रीबाबत महिलांनी ओझर पोलिस ठाणे व ग्रामपंचायतीला निवेदन दिले हाेते. मात्र, दखल घेतली न गेल्याने महिलांनी पाच दिवसांपूर्वी एका हॉटेलवर माेर्चा काढला. यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीवर कारवाई केली. मात्र, त्यानंतरही गावात दारू विक्री सुरूच होती. शुक्रवारी (दि. २३) रात्री नऊ वाजेच्या सुमारास गावातीलच एका वस्तीत महिलेच्या घरी दारू सापडल्यानेआक्रमक झालेल्या महिलांनीआेझर-सुकेणा रस्त्यावर रात्री नऊ वाजता दारूच्या बाटल्या फोडत ठिय्या आंदोलन केले. पोलिसपाटील विजय गहिले यांनी ओझर पोलिसांना माहिती दिल्याने पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गावातील नागरिक व्यसनाधीन होत असल्याने महिन्यापासून महिलांकडून आंदोलन केले जात आहे. यामुळे संतप्त महिलांनी पाेलिसांना जाब विचारला. दारू विक्री करणाऱ्या व्यक्तींना पोलिसांनी अटक केल्यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले.

राज्य उत्पादक शुल्क विभागाने कारवाई करावी ओझर पोलिस स्टेशनच्या वतीने दीक्षी गावातील अवैध दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीवर वेळोवेळी कारवाई करण्यात आली आहे. मात्र राज्य उत्पादक शुल्क विभागाने कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.