आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील मंगरुळ शिवारातील तळवाडेराेडवर वाहनातून दारूची बेकायदेशीरपणे वाहतूक करताना मिळून आल्याने चांदवड पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एकूण ४ लाख ६५ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पाेलिस अधीक्षकांनी तयार केलेल्या विशेष पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करून मंगरुळ शिवारातील तळवाडे रोडवर दारुची अवैधरित्या वाहतूक करणारी कार (एमएच १५ एचएच १७३२) ताब्यात घेतली.
या कारवाईत पोलिसांनी देशी-विदेशी दारुचे बॉक्स दाेन माेबाइल, २ लाख १३ हजार ८० रुपयांची रोकड व १ लाख ५० हजार रुपये किमतीची कार असा एकूण ४ लाख ६५ हजार ६५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चांदवड पोलिसांत देवेश राकेश कांबळे (१९, रा. पंचवटी, नाशिक) व किरण उर्फ मयुर देविदास पवार (२८, रा. खेडगाव ता. दिंडोरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास हवालदार दीपक मोरे करीत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.