आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्री महाजनांना साकडे:पूरग्रस्तांना तातडीने मदत द्यावी

सिन्नरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर शहरात ढगफुटी सदृश्य पाउस झाल्याने सरस्वती नदीला आलेल्या पुरात नदी काठावरील अनेक घरांचे पूर्णतः नुकसान झालेले असून संसार उपयोगी साहित्य पुरात वाहून गेले आहे. श्री भैरवनाथ महाराज शॉपिंग सेंटर मधील सर्व गाळ्यांमध्ये पुराचे पाणी घुसून या व्यावसायिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. त्यांना तातडीने योग्य ती मदत मिळावी, अशी मागणी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

पूरामध्ये गावाबाहेरील देवी मंदिर, अपना गॅरेज, भंडारवाडी, काजीपुरा येथे वास्तव्यास असलेल्या नागरिकांचे नुकसान झाले आहे. शॉपिंग सेंटरमधील किराणा, सौंदर्य प्रसाधने, मिठाई विक्रेते, चाट भंडार, कापड दुकानदार, सलून तसेच भाजीपाला विक्रेते व फेरीवाले यांचे सर्व साहित्य वाहून गेले.

या पूरग्रस्तांना तातडीने मदत मिळावी. खासदार पूल, नवापूल व पडकी वेस येथील पूल हे जिर्ण झालेले असून त्यांचे नूतनीकरणासह उंची वाढविण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून विशेष बाब म्हणून मंजुरी द्यावी, अशी मागणी वाजे यांनी केली. वाजे ग्रामीण भागात पाहणी दौऱ्यावर होते. त्यांचे निवेदन शिवसेना युवानेते उदय सांगळे यांनी महाजन यांना दिले. भाटवाडी सरपंच मनोज महात्मे, सागर शिरसाट, शाम बोऱ्हाडे, सोनू पेखळे, प्रशांत रायते, अवधूत आव्हाड उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...