आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सूर्योदयापासून सायंकाळी 6 पर्यंत विसर्जन मुहूर्त; निर्माल्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे आवाहन

सिन्नरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नरकरांनी सुरक्षित स्थळी गणेशाचे विसर्जन करून शाडू माती मिश्रित पाणी झाडांना घालून पर्यावरणाचे रक्षण करावे. सकाळी सूर्योदयापासून तर संध्याकाळी ६ वाजून ८ मिनिटापर्यंत गणेश विसर्जनाचा मुहूर्त असून ही वेळ पाळून नागरिकांनी बाप्पाला निरोप द्यावा, असे आवाहन ज्योतिष मनोज खेडलेकर यांनी केले आहे.घरगुती बाप्पाचे गणेश विसर्जन करताना प्रारंभी हळदी, कुंकू, अक्षदा यांनी पूजन करावे. त्यानंतर दूर्वा, पुष्पहार अर्पण करून मोदकाचा नैवेद्य दाखवावा. नंतर गणपतीची आरती करून पर्यावरणस्नेही विसर्जन करावे.

ज्या व्यक्तींना घरात किंवा मोकळ्या जागेत विसर्जन करायचे असेल त्यांनी बादली, टफ, हौद या ठिकाणी शुद्ध जलात गणेशाची मूर्ती विसर्जित करावी. सार्वजनिक ठिकाणीही याच पद्धतीचा अवलंब करून बाप्पाच्या मूर्तीचा अवमान होणार नाही याची काळजी नागरिकांनी घ्यावी, असेही ज्योतिष मनोज खेडलेकर यांनी सांगितले.

मूर्तींचे दान करा
गणेशमूर्ती नदीत, तलावात किंवा अन्य सार्वजनिक पाणथळ जागांवर विसर्जन करताना नंतर त्या उघड्या पडतात. बऱ्याचदा त्यांची विटंबना होते, ही बाब टाळण्यासाठी नागरिकांनी मूर्ती दान करावी, असे आवाहन अनिसचे हरिभाऊ तांबे, डॉ. श्यामसुंदर झळके यांनी केले आहे.

निर्माल्य संकलित करून प्रदूषण टाळा
गणेशमूर्ती विसर्जित केल्यानंतर मोठ्या प्रमाणात निर्माल्य नदीपात्रात आणि इतर सार्वजनिक ठिकाणांवर फेकून प्रदूषण केले जाते नागरिकांनी ही बाब विचारात घेऊन निर्माल्य संकलित करावे त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी मात्र नदीपात्र किंवा इतर सार्वजनिक पातळ जागेवर ते फेकू नये.
राहुल मुळे, शिक्षक

बातम्या आणखी आहेत...