आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिमाखात:पहिले पाउल उपक्रमाची अंमलबजावणी; दोन वर्षांनंतर शाळांमध्ये प्रवेशोत्सव होणार दिमाखात

सिन्नर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

६ ते १४ वयोगटातील १००% बालकांना शाळेत प्रवेश देणे. ४.५ पेक्षा जास्त वयाच्या बालकांना लगतच्या पहिलीच्या वर्गात बसविणे, किचन शेड दुरुस्ती करणे. वीजपुरवठा सुरळीत करणे. अवघड ठिकाणच्या शांळांना सोलर पॅनल बसविणे. पहिले पाउल उपक्रमाची अंमलबजावणी करणे, मातृभाषेतून शिक्षण उपक्रमांचा आढावा घेणे, बोलीभाषेतून शिक्षण देण्यासाठी आराखडा तयार करणे. टॅब दिलेल्या शाळांमध्ये नालंदा प्रकल्पा प्रमाणे कार्यवाही करणे, डिजिटल क्लास रूम कार्यान्वित करणे, वायफाय कनेक्शनच्या ठिकाणी आढावा घेणे आदी सूचनांचा समावेश आहे.

शाळा प्रवेशोत्सव यंदा दिमाखात करण्याचे नियोजन शिक्षण विभागाने आखले आहे. १५ जूनला हा सोहळा होणार असून दोन दिवस अगोदरच सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षकांना शाळेवर उपस्थित राहून प्रवेशोत्सव तयारीची सूचीत केले आहे. तालुक्यात ६३३७ पात्रताधारक असून २६५९ विद्यार्थ्यांना पहिल्या प्रवेशा मोत्सवात प्रवेश दिला आहे.

गटशिक्षणाधिकारी मंजूषा साळुंखे यांनी सरकारच्या आदेशानुसार प्रवेश उत्सवाबाबत शिक्षकांना २२ सूचना केल्या आहेत. सर्व माध्यमांच्या शाळा सोमवार (दि. १३) पासून सुरू होणार असून त्या दिवशी सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित राहतील. प्रत्यक्षात बुधवारी (दि. १५)पासून शैक्षणिक वर्षास सुरुवात होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...