आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:चांदवडमधील रस्त्यांची सुधारणा करा; ग्रामस्थ व व्यापाऱ्यांचे मुख्याधिकारी, प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

चांदवड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून नागरिक व वाहनचालकांना रस्त्यांच्या समस्येमुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे रस्त्यांची पावसाळ्यापूर्वी तातडीने सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी सोमवार पेठ परिसरातील नागरिक व व्यापाऱ्यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजित कदम, उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शहरातील रस्त्यांची अतिशय बिकट अवस्था झाली आहे. सोमवार पेठ, वरचे गाव, शनिमंदिर परिसर, शिंपी गल्ली, आठवडे बाजारतळ आदी परिसरासह ठिकठिकाणी रस्त्यांना मोठमोठे खड्डे पडले असून गजदेखील रस्त्यातून बाहेर आले आहेत. त्यामुळे वाहनचालकांचे लहान-मोठे अपघात घडण्याची दाट शक्यता आहे. खड्ड्यांमुळे वाहनचालकांना वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे तर नागरिकांना पायी चालणेही जिकिरीचे झाले आहे. रस्त्यांच्या दुर्दशेमुळे ज्येष्ठ नागरिक, वृद्ध व महिलांना मणक्यांच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत अनेकवेळा नगरपरिषद प्रशासनास निवेदन देऊनही त्याची दखल घेतली जात नाही. रस्त्यांच्या समस्येकडे तत्काळ गांभीर्याने लक्ष देऊन पावसाळ्यापूर्वी सर्वच रस्त्यांची सुधारणा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनावर मांगीलाल कासलीवाल, रेवन क्षत्रिय, अनिल महाजन, जितेंद्र डुंगरवाल, योगेश गुजराथी, नीलेश खंदारे, योगेश सोनवणे, अभिजित सोनवणे, श्रीनिवास सोनवणे, बाळासाहेब क्षत्रिय, भरत कासलीवाल, सुभाष गुजराथी, बाळासाहेब क्षत्रिय, उत्तम व्यवहारे, प्रवीण वाघ, कल्पेश तिल्लोडा, आकाश देवरे, निखिल फलके, भिकचंद व्यवहारे, दीपक व्यवहारे, मोहन होनराव, रंगनाथ सोनवणे, मुश्ताक शेख, दिलीप शर्मा, मनोज छाजेड, दिलीप राऊत, भाऊसाहेब जाधव, महेश गुंजाळ, सुश्रुत देवरे, वीरेंद्र छाजेड, अमोल राऊत, बाळासाहेब नेवकर, महेंद्र गांधी, प्रकाश शेजवळ, प्रकाश गुजराथी, चंद्रकांत जंगम, रौनक गुजराथी, सचिन गुजराथी, प्रणय ललवानी, चंदू पारखे, साहेबराव झोटिंग, अनिकेत बोरसे, महेश पलोड आदींसह व्यापारी व नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...