आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:अभोण्यात सशस्त्र चोरांनी 8 घरे फोडली, हजारोची लूट

अभोणा22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदुरी रस्त्यावरील कृष्णनगर या नववसाहतीत आठ घरांचे कडीकोयंडे गॅस कटरच्या सहाय्याने कापून चार सशस्त्र चोरांनी हजारो रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याने व्यावसायिकांसह नागरिकांत मोठी दहशत पसरली आहे.

अभोणा येथील नांदुरी रस्त्यावरील नववसाहतीत पूर्व भागातील नाल्याकडून आलेल्या अंदाजे चार चोरांनी आठ कुलूपबंद घरांचे कडीकोयंडे तोडून दागदागिन्यांसह मुद्देमाल लंपास केला. येथील एकनाथ कुवर यांच्या मालकीच्या चार खोल्यांसह शिक्षक एन. के. पगार, व्ही. टी. वाघ, भाग्यश्री गणेश अहिरे यांच्या कुलूपबंद घरांचे कडीकोयंडे गॅस कटरने कापून चोरांनी धाडसी घरफोडी केली.

यावेळी जिभाऊ पांडुरंग बागूल यांच्या घरातून सोन्याची चेन (किंमत १२ हजार रुपये), कानातील सोन्याची रिंग (किंमत १३,१९० रुपये), शिक्षक एन. के. पगार यांच्या घरातून चोरीस गेलेल्या पाकिटात रोख दोन हजार रुपये, एटीएम कार्ड, आधारकार्ड आदी कागदपत्रे होती. भाग्यश्री अहिरे यांच्या घरातून चांदीचे दागिनेे व मौल्यवान मुद्देमाल चोरीस गेला. व्ही. टी. वाघ यांच्या घरातून देखील किमती ऐवज लंपास करण्यात आला आहे. दरम्यान, येथील एका घराच्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कपड्याने चेहरा झाकलेले चार सशस्त्र चोर कैद झाले आहेत, तर एकजण हातात पिस्तूल घेऊन घरांची पाहणी करतानाचा व्हिडिओ समोर आल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांची अभोणा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...