आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील श्री नेमिनाथ जैन ब्रम्हचर्याश्रम संचालित, लीलाबाई दलूभाऊ जैन अध्यापक विद्यालयात बक्षीस वितरण २०२२-२३ कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती व संस्थापक पू. काकाजी यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या प्रबंध समितीचे सदस्य व अध्यापक विद्यालयाचे समन्वयक सीए महावीर पारख होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी छात्राध्यापकांना संबोधित करताना देशासाठी कार्य करत असताना आपले कौशल्य वापरून येणाऱ्या प्रलोभनापासून दूर रहावे. तसेच मोबाइलचा उपयोग योग्य कामासाठी करावा असे आवाहन केले. माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संगीता बाफना यांनी मनोगत व्यक्त केले.
अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य धनंजय मोरे यांनी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये छात्राध्यापकांनी मिळविलेल्या यशाचा व अध्यापक विद्यालयाच्या कार्याचा अहवाल प्रास्ताविक स्वरूपात सादर केला. अध्यापक विद्यालयात घेण्यात आलेल्या बौद्धिक विभागात वादविवाद, निबंध, काव्यवाचन, वक्तृत्व व क्रीडा विभागात खो-खो, गोळाफेक, थाळीफेक, १०० मी. धावणे, २०० मी. धावणे, उंच उडी, लांब उडी तसेच कलात्मक विभागात पाककला, मेहंदी, रांगोळी, पारंपारिक वेशभूषा आदी स्पर्धांमध्ये व वार्षिक परीक्षेत यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष दिनेश लोढा, मानद सचिव जवाहरलाल आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित सुराणा, प्रबंध समितीचे उपाध्यक्ष अरविंद भन्साळी, प्रशासकीय अधिकारी प्रमोद गाळणकर यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचिता सोमासे हिने केले. प्रा. विजय गुंजाळ यांनी आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.