आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी अखेर पूर्ण:डांगसौंदाणे उपबाजार समितीत विजयादशमीला शेतमाल खरेदी शुभारंभ

डांगसौंदाणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती संलग्न डांगसौंदाणे उपबाजार समितीत शेतमाल खरेदीचा शुभारंभ विजयादशमीच्या मुहूर्तावर होत असल्याची माहिती सभापती पंकज ठाकरे व संचालक संजय सोनवणे यांनी दिली आहे.उपबाजार समितीची अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्ण हाेत आहे.

या भागातील शेतमाल विक्री सुलभ व्हावी, शेतकऱ्यांना वाहतुकीच्या दृष्टीने सोयीचे व्हावे, यासाठी माजी सभापती व विद्यमान संचालक संजय सोनवणे यांनी या उपबाजार समितीसाठी पाठपुरावा करीत उपबाजार समितीला मंजुरी मिळविली होती. डांगसौंदाणे उपबाजार समितीसाठी सटाणा बाजार समितीने शासनाकडून जागा खरेदी करीत हे उपबाजारावर विजयादशमीच्या मुहूर्तावर सुरू करीत आहे. सचिव भास्कर तांबे यांनी माहिती दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...