आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनव सांस्कृतिक मंडळ संचालित के. प्रभाकर दत्तात्रय गुप्ते पूर्वप्राथमिक व प्राथमिक आदर्श विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी श्रीमदभगवदगीता व श्रीकृष्णाष्टकचे सामूहिक पठण, गणेश वंदना, गोंधळ,ईशस्तवन आदी आध्यात्मिक संस्काराचे दर्शन घडवून आणतानाच देशभक्तीपर गीते, शेतकरी गीते, आदिवासी गीते, कोळी गीते, विविध नृत्याविष्कार व अनेक वैविध्यपूर्ण कलागुणांचा आविष्कार सादर केला. संस्कार, संस्कृती, कला व आध्यात्मिक दृष्टीचे हे मालेगावच्या शैक्षणिक विश्वातील अनोखे स्नेहसंमेलन ठरले.
कॅम्पातील बालगंधर्व नाट्यमंदिर येथे हे दोन दिवशीय स्नेहसंमेलन झाले. उद्घाटन समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून वरदा गुप्ते प्रधान उपस्थितीत होत्या. अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा शैलजा गुप्ते होत्या. सचिव अरविंद गुप्ते, खजिनदार सुधाकर मालपुरे व कार्यकारिणी सदस्य सुयोग प्रधान उपस्थित होते. मुख्याध्यापिका प्राजक्ता मिश्रा यांनी प्रमुख अतिथींचा सत्कार केला. क्रीडास्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा प्रधान, गुप्ते व संस्थेच्या पदाधिकारी यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी प्रमुख अतिथी म्हणून महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे उपस्थित होत्या.
गुप्ते यांनी त्यांचे स्वागत करून सत्कार केला. शैक्षणिक प्रगतीत अव्वल असलेल्या इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना एक हजार एक रुपये पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल कापडणीस यांनी तर सूत्रसंचालन वर्षा विभांडीक, चेतन राजपूत, कविता पवार, भाग्यश्री बोरसे यांनी केले. कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या शिक्षिका अश्विनी जक्कलवाड, प्रभू शिंदे, मीना कुलकर्णी, कल्पना देशपांडे, प्रतिमा बोरसे, बापू त्रिभुवन तसेच सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.