आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करात्र्यंबकेश्वर तालुक्यातील कळमुस्ते ग्रामपंचायतीतील शिंदे पाड्यात स्वदेश फाउंडेशन व आदर्श ग्रामविकास समिती यांच्या समन्वय व श्रमदानामुळे अनेक वर्षांपासून रेंगाळत असलेला पाणी प्रश्न सोडविण्यात आला असून घराघरात नळांमार्फत पाणी पोहाेचविण्यात यश आले आहे. त्याचा लोकार्पण सोहळा नुकताच गावातील ज्येष्ठ महिलांच्या हस्ते पार पडला.यावेळी स्वदेश फाउंडेशनचे तालुका समन्वयक अनिल मस्के, इंजिनियर अमित पांडे, सरपंच हिरामण चावरे, ग्रामविकास समिती अध्यक्ष सीताबाई राऊतमाळे, पोलिस पाटील हिरामण शिंदे आदी उपस्थित होते.
कळमुस्ते ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या शिंदे पाडा या छोट्याशा गावात अनेक दशकांपासून पाणी टंचाईची समस्या ग्रामस्थांना भेडसावत हाेती. ग्रामस्थांना एक ते दीड किलोमीटर अंतर जाऊन पाणी आणावे लागत हाेते. त्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी हाेणारी पायपीट लक्षात घेता आदर्श गाव विकास समिती कळमुस्ते व स्वदेश फाउंडेशन यांच्या समन्वयातून ग्रामस्थांनी ५४ हजार रुपये लोक वर्गणी जमवली तर स्वदेश फाउंंडेशनने १४ लाख ४६ हजार रुपयांचा निधी असा एकूण पंधरा लाख रुपये खर्च करत गावातील ३६ घरांत थेट नळाद्वारे पाणी पोहोचविण्यात आले. या घराघरात नळाद्वारे पाणी पोहोचवण्याच्या लोकार्पण सोहळ्या वेळी शिंदेपाडा ग्रामस्थ व महिला वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला.
शेतकऱ्याकडून २ गुंठे जागा माेफत येथील शेतकरी साेमनाथ चावरे यांनी त्यांच्या मालकीची दाेन गुठे जागा या उपक्रमासाठी माेफत दिली आहे. या जागेवर टाकी विद्युत पंपासाठी साेलर यंत्रणा व स्टॅंड उभे करण्यात आले आहे. त्यांच्या या दानशूर पणामुळे ही याेजना मार्गी लागली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.