आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तालुक्यातील २२ गावांमध्ये ग्रामपंचायतस्तरावर विविध प्रकारच्या २९ कामांचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती रोहयोचे सहगट कार्यक्रम अधिकारी तथा गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांनी दिली.
देवपूर गटात पंचाळे, श्रीरामपूर, सोमठाणे, नांदूरशिंगोटे गटात दोडी बुद्रुक, मानोरी, नांदूरशिंगोटे, मुसळगाव गटात गुळवंच, भोकणी, फर्दापूर, मनेगाव, चास गटात पिंपळे, शिवाजीनगर (माळवाडी), दापूर, खंबाळे, ठाणगाव गटात विंचूरदळवी, बेलू, बोरखिंड, नायगाव गटात केपानगर, जायगाव, देशवंडी, पास्ते, वडझिरे आदी ठिकाणी पाणंद रस्ता, संरक्षक भिंत, वैयक्तिक गोठा, वैयक्तिक फळबाग लागवड, शोषखड्डा आदी स्वरूपाची नरेगा अंतर्गत येणारी कामे करण्यात येणार आहेत.
त्या-त्या गावांतील सरपंच, कर्मचारी, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य आदींच्या उपस्थितीत या कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
पंचायत समितीचे कृषी अधिकारी, शाखा अभियंता, ग्रामपंचायतचे विस्तार अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियंता, सहाय्यक अभियंता यांना गावनिहाय जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्या गावातील सरपंच, ग्रामसेवक यांच्यामार्फत समन्वय साधून नेमून दिलेली कामे तातडीने सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नरेगा अंतर्गत या गावांमध्ये कामे मार्गी लागण्याबरोबरच बेरोजगारांना रोजगारही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या वतीने नरेगा विभागाने गावनिहाय कामांचे नियोजन केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.