आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामांना मंजुरी‎:नगरसूलचा अमृत भारत‎ स्थानक योजनेत समावेश‎

येवला‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगरसूल रेल्वे स्थानकात फलाट क्र.‎ १ व २ ला जोडण्यासाठी दुसऱ्या‎ पादचारी पूल व कव्हर ओव्हर‎ प्लॅटफॉर्मला मंजुरी मिळाली आहे.‎ या कामासाठी तीन कोटी ४७ लाख‎ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला‎ आहे. या कामामुळे प्रवाशांना‎ अधिक सुविधा उपलब्ध होणार‎ आहे.‎ येवला मतदारसंघातील नगरसूल‎ रेल्वेस्थानकात अधिक सुविधा‎ निर्माण करून स्थानकाचा विकास‎ करावा यासाठी राज्याचे माजी‎ उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी‎ केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव‎ यांच्याकडे पत्रव्यवहार करून‎ मागणी केली हाेती.

रेल्वे‎ स्थानकाच्या विकासासाठी त्यांचा‎ सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.‎ त्यानुसार रेल्वेस्थानकाच्या‎ विकासाच्या दृष्टीने विविध कामांना‎ प्राधान्य देण्यात येत आहे.‎ रेल्वे विभागाच्या वतीने जाहीर‎ दक्षिण मध्य रेल्वे पिंक बुक‎ २०२३-२४ मध्ये नगरसूल रेल्वे‎ स्थानकात फलाट क्र. १ व २ ला‎ जोडण्यासाठी दुसरा पादचारी पूल व‎ ३०० मीटर कव्हर ओव्हर प्लॅटफॉर्म‎ मंजूर करण्यात आले आहे. यासाठी‎ तीन कोटी ४७ लाख रुपये निधीची‎ तरतूद करण्यात आली आहे.‎ नगरसूल स्थानकाचा अमृत भारत‎ स्थानक योजनेत समावेश करण्यात‎ आलेला आहे. योजनेअंतर्गत या‎ कामाला लवकरच सुरुवात होणार‎ आहे.‎

बातम्या आणखी आहेत...