आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोना महामारीमुळे दोन वर्ष ऑनलाइन शिक्षणामुळे दहावीचा निकालात घसरण झाली होती. ऑफलाइन शिक्षणामुळे यंदा मात्र दहावीच्या निकालात १ टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून सिन्नर तालुक्याचा यंदाचा निकाल ९७.५१ टक्के लागला. विशेष म्हणजे ७७ पैकी तालुक्यातील तब्बल ३१ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. नव्वदी पार विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून ५४११ विद्यार्थ्यांपैकी तब्बल २७६० विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे यंदा दहावीच्या निकालात गुणांचा रतीब घातल्याचे पाहायला मिळाले आहे.
तालुक्यात २९६८ पैकी २८७८ मुले दहावी उत्तीर्ण झाली. मुलांचा निकालाचा टक्का ९६.९६ टक्के इतका आहे. तर २५८१ मुलींपैकी २५३३ मुली उत्तीर्ण झाल्या. मुलांच्या तुलनेत मुली सरस ठरल्या असून ९८.१४ टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. ५ हजार ५४९ पैकी ५ हजार ४११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
एस. जी. पब्लिक स्कूलच्या उज्वल यशाची परंपरा कायम : येथील माध्यमिक लोक शिक्षण मंडळ संचलित एस. जी. पब्लिक स्कूल माध्यमिक विभागाचा इयत्ता दहावीच्या मराठी माध्यमाचा निकाल १०० टक्के लागला. सानिका गोरे (९३), प्रणाली वाळके (९२.४०), सुनिता घुले(९२.४०), मानसी सांगळे (९१.८०), वैष्णवी सोनवणे (९१.६०), खुशी घुले (९१.६०), पृथ्वीज निरगुडे (९१.००) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ व पंचम क्रमांक मिळवत यश संपादन केले.
एस. जी. पब्लिक स्कूल इंग्रजी माध्यमाचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून विद्यालयातील अनुष्का शेळके ९२, स्वाती नहार ८७.८०, विनीत यादव ८५.२० टक्के गुण मिळवून अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविला. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष अण्णासाहेब गडाख, उपाध्यक्ष दौलतराव मोगल, संचालक विजय गडाख, व्यवस्थापक अभिषेक गडाख, मुख्याध्यापक रघुनाथ एरंडे, पर्यवेक्षक माधवराव शिंदे, इंग्रजी विभाग प्रमुख अनिता कांडेकर आदींनी अभिनंदन केले.
भिकुसा विद्यालयात शिवानी बिन्नर प्रथम : गोखले एज्युकेशन सोसायटीच्या भिकुसा विद्यालयाचा निकाल ९८.२१ टक्के लागला. शिवानी दत्तात्रय बिन्नर ९६.२०, दिलीप मोरे ८७.८०, श्वेता वसंत रेवगडे ८६.८० टक्के गुण मिळवून अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
किड्स अकॅडमीचा १०० टक्के निकाल : सिन्नर शहरातील किड्स अकॅडमीचा सलग दुसऱ्या वर्षी शंभर टक्के निकाल लागला प्रियांशू प्रमोद मोहिते ९६ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम आला. भक्ती उदय गायकवाड व सिद्धी मारुती आव्हाड या विद्यार्थिनी ९३.००% गुण मिळवून द्वितीय तसेच स्नेहा विनायक गवळी या विद्यार्थिनीने ९०.६०% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा अनुप्रिया पवार, समन्वयक अभिषेक पवार, मुख्याध्यापक मनीषा सावखेडकर, उपमुख्याध्यापक लक्ष्मण ढोन्नर, सचिन गुरुळे आदींनी अभिनंदन केले.
हे विद्यार्थी ठरले टॉपर
सिन्नर शहरातील भिकुसा विद्यालयाची शिवानी दत्तात्रय बिन्नर हिने ९६.२० टक्के गुण विद्यालयात प्रथम, लो.शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयातील ईश्वरी राजेंद्र कोकाटे ९५.८० टक्के गुण मिळवून प्रथम आली. एस. जी. पब्लिक स्कूलमधील मराठी भागात सानिका गोरे ९३ टक्के गुण मिळवून तर इंग्रजी विभागात अनुष्का शेळके ९२ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली.
४ वर्षांत सर्वाधिक निकाल
चार वर्षांत यंदा दहावीचा निकाल सर्वाधिक लागला आहे. २०१९ साली ९३.१० टक्के, २०२० साली ९४.६५ टक्के तर २०२१ साली ९६.१२ टक्के इतका निकाल लागला होता. यंदा त्यात जवळपास एक टक्केहून अधिक भर पडली असून ९७.५१ टक्के इतका चार वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक निकाल लागला आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाच्या तुलनेत ऑफलाईन शिक्षण सरस असल्याचे यानिमित्ताने समोर आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.