आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन गटांत परीक्षा घेण्यात येणार:विवेकानंद केंद्रातर्फे भारतीय संस्कृती परीक्षा

मालेगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विवेकानंद केंद्र मालेगाव शाखेने ऑगस्ट २०२२ मध्ये भारतीय संस्कृती परीक्षा घेण्यात येत आहे. १८ ते ४० वर्षे वयातील परीक्षार्थींसाठी खुला तर बारावी पास विद्यार्थ्यांसाठी अशा दोन गटांत परीक्षा घेण्यात येणार आहे. स्वराज्य ७५ स्वामी विवेकानंद व युवा या पुस्तकावर आधारित असलेली ही लेखी परीक्षा ५० गुणांची आहे. उत्तीर्ण होणाऱ्यांना मालेगाव येथे होणाऱ्या एक दिवसीय व्यक्तिमत्त्व विकास शिबिरात सहभागी होता येईल.

केंद्राच्या विविध उपक्रमांत सहभागी होणाऱ्या तरुणांना दि. २५, २६ व २७ डिसेंबर रोजी कन्याकुमारी येथे होणाऱ्या शिबिरास सहभागी होण्याची संधी आहे. भारतीय संस्कृती परीक्षा आणि व्यक्तिमत्त्व विकास शिबिर हे अनुक्रमे ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात मालेगावीच होणार आहेत. इच्छुकांनी नोंदणीसाठी डॉ. सुरेश शास्त्री (९४२२२७०२३४), सुरेश चौधरी (८००७१२३०८४) यांच्याशी संपर्क साधावा.

बातम्या आणखी आहेत...