आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सकारात्मक:250 एकर जमीन स्टाइसला देण्यास उद्योगमंत्री सकारात्मक

सिन्नर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडिया बुल्स कंपनीच्या २५० एकर जमीन स्टाइसला मिळावी, माळेगाव एमआयडीसी ते सेझ पर्यंत नव्याने टाकल्या जाणाऱ्या पाइपलाइनमधून स्टाइसला ररोज २५०० घनमीटर पाणी आणण्यास परवानगी मिळावी व स्टाइस संस्थेच्या मालकीची नीलकमल कंपनीस द्यावयाची जमीन सेझच्या संपादन प्रस्तावातूनवगळावीत, या स्टाइसच्या मागण्या तत्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले.

खासदार हेमंत गोडसे यांच्यासोबत स्टाइसचे अध्यक्ष नामकर्ण आवारे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने बुधवारी (दि.९) महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेटघेऊन प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा केली. यावेळी उद्योगमंत्री सावंत यांनी स्टाइसच्या पत्रांवर सकारात्मक शेरा मारून सचिवांना संबंधित विषय तातडीने मार्गीलावण्याचा सूचना दिल्याचे स्टाइसचे अध्यक्ष नामकर्ण आवारे यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे संचालक विठ्ठल जपे, नीलकमल कंपनीचे व्हाइस प्रेसिडेंट दिनकर कठाडे हे उपस्थित होते.

इंडिया बुल्स व सध्याचे रतन इंडिया, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांचा संयुक्त सेझच्या क्षेत्रातील उद्योगासाठी माळेगाव ते गुळवंचपर्यंत पाइपलाइन टाकण्याचे काम होती घेणार आहे. सदरची पाइपलाइन टाकण्याची योजना तयार करताना सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीस प्रतिदिनी २५०० घनमीटरपाण्याचा पुरवठा नियोजित पाइपलाइनमधून करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आदेश द्यावेत, अशी मागणी केली. स्टाइसमध्ये उद्योग सुरू करण्यासाठी अनेक उद्योजक उत्सुक असून त्यासाठी जमीन कमी पडत आहे.

मुसळगाव-गुळवंच शिवारातील इंडिया बुल्स सध्याची रतन इंडिया कंपनी व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांचे संयुक्त सेझमधील २५० एकर जमीन यासंस्थेच्या विस्तारासाठी भाडेपट्ट्याने मिळण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे नाशिक व मुंबई कार्यालयाकडे दाखल केलेला आहे. त्याप्रस्तावाप्रमाणे २५० एकर जमीन संस्थेच्या नावे ९९ वर्षांच्या भाडेपट्ट‌याने मिळावी, अशी मागणी उद्योगमंत्री सावंत यांच्याकडे केली.

बातम्या आणखी आहेत...