आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपाययोजना:तापमानवाढीमुळे कांदा‎ पिकावर थ्रीप्सचा प्रादुर्भाव‎

सिन्नर‎14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तापमानात वाढ होऊ लागली आहे.‎ त्यामुळे कांदा पातीवर रसशोषक‎ किडीचा (थ्रीप्स) प्रादुर्भाव दिसून‎ येत आहे. परिणाम स्वरूप‎ उत्पादनात १५ ते २० टक्के नुकसान‎ होण्याची शक्यता चितेगाव येथील‎ राष्ट्रीय बागवानी अनुसंधान‎ केंद्रातील तांत्रिक अधिकारी डॉ.‎ मनोज कुमार पांडे, डॉ. नितीश शर्मा,‎ श्रीवर्षा, प्रकल्पप्रमुख सुजय पांडे,‎ संदीप लवांड यांनी व्यक्त केली‎ आहे.‎ सिन्नर, निफाड परिसरातील विविध‎ गावांना संशोधन केंद्राच्या वतीने‎ भेटी देण्यात आल्या. थ्रीप्स हा‎ पिवळा कीटक असून तो पातीच्या‎ गाभ्यातून रस शोषण करतो.

त्यामुळे‎ पात पिवळी पडते. त्याचा कांदा‎ पोषणावर दुष्परिणाम होतो. उत्पादन‎ घटल्याचा परिणामही जाणवतो.‎ त्यामुळे शेतकऱ्यांनी उपाययोजना‎ कराव्यात, असे आवाहन‎ मनोजकुमार पांडे यांनी केले आहे.‎ नियंत्रणासाठी हा करा उपाय :‎ एक लिटर पाण्यात फिमोनील किंवा‎ कार्बोसल्फान दोन मिली अथवा‎ प्रोफेनोफाॅस एक मिली मिसळावे. या‎ द्रावणाची दर दहा दिवसांनी फवारणी‎ करावी. थ्रीप्सच्या नियंत्रणासाठी‎ स्पायनोसॅण्ड ०.३ मिली प्रति लिटर‎ पाण्यात टाकून त्याची फवारणी‎ द्यावी. ती फायदेशीर ठरते.‎

बातम्या आणखी आहेत...